Just another WordPress site

दुसखेडा जि.प.प्राथमिक शाळेत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश वाटप !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक

पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-

दि.२३ जुलै २५ बुधवार

तालुक्यातील दुसखेडा येथील जि.प.प्राथमिक शाळेत ६२ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियान अंतर्गत काल दि.२२ जुलै मंगळवार रोजी पोलिस पाटील सौ.संगिता विशाल दांडगे यांचे हस्ते शालेय गणवेश व शूज तसेच पायमोजे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन दुसखेडा सरपंच सौ.लक्ष्मीताई सोनवणे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल सोनवणे,पालक वर्ग अश्वीनी सोनवणे,सुषमा तायडे,पुनम सोनवणे,काजल सोनवणे,निंबाबाई सोनवणे,उज्वला तायडे,इंदूबाई सोनवणे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक विनोद तायडे यांनी केले तर आभार उपशिक्षक प्रशांत पाटील,नितिन चौधरी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी प्रियंका सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.