भडगाव येथे संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने प्रतिमा मिरवणूक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव-तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२४ जुलै २५ गुरुवार
येथील समस्त माळी पंच मंडळ व महात्मा फुले बहुउद्देशीय संस्था यांचं संयुक्त विद्यमाने संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने शहरात संत सावता महाराज यांच्या प्रतिमा मिरवणूक व मल्हार नगर येथील नियोजित माळी समाज मंगलकार्यालय येथे गुणवंत विद्यार्थीचा सत्कार व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रारंभी शनी चौक येथून महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष साहेबराव महाजन व माळी समाज अध्यक्ष मुकुंदा महाजन याच्या हस्ते संत सावता महाराजाच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमा मिरवणूक ही बाजार चौकातून मोठ्या जल्लोषात वाजतगाजत शहरातुन मेनरोड मार्गाने भागवत कॉलनी कोठली रोड लगत मल्हार नगर येथील नियोजित माळी समाज मंगलकार्यालय पर्यंत मिरवण्यात आली.यावेळी आमदार किशोर आप्पा पाटिल, शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर पाटिल,माजी जिल्हापरिषद सदस्य भुरा पाटिल,नगरसेवक डॉ.विजयकुमार देशमुख,चौधरी समाज अध्यक्ष नाना चौधरी,शिवसेना शहर प्रमुख अजय (आबा) चौधरी, दक्षता समितीचे जितू आचारी यांनी प्रतिमा मिवणुकी दरम्यान भेट देत प्रतिमेचे पूजन केले.
महाप्रसाद व गुणवंत र्विद्यार्थीचा सत्कार !!
मिरवणूक समारोपानंतर नियोजित माळी समाज मंगलकार्यालय येथे समाजातील गुणवंत र्विद्यार्थीचा सत्कार पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार,मुख्याधिकारी रवींद्र लांडे,माजी प्रथम नगराध्यक्ष शशी येवले,माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील,डॉ.प्रमोद पाटील,नगरसेविका योजना पाटील,युवा सेना जिल्हाअध्यक्ष लखीचंद पाटिल,राष्ट्रवादी काँगेस माजी तालुका अध्यक्ष हर्षल पाटील,बालविकास प्राथमिक शाळेचे अध्यक्ष विजय महाजन,चर्मकार महासंघाचे तालुका अध्यक्ष रवी अहिरे,नगरसेवक जगन भोई,महेंद्र ततार,महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष साहेबराव महाजन व माळी समाज अध्यक्ष मुकुंदा महाजन यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर समाज बांधव हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद महाजन,ज्येष्ठ पत्रकार शिवदास महाजन,मनोज महाजन,भिकन महाजन,पत्रकार सागर महाजन,पत्रकार चेतन महाजन,नितीन महाजन,अनिल महाजन,प्रा. राजेंद्र महाजन,गणेश माळी,प्रदीप महाजन,मनोज उत्तम महाजन,विजय महाजन,गोविंद महाजन,देवराम महाजन,रमेश महाजन,अशोक महाजन,ॲड.विजय महाजन,शुभम शालीग्राम माळी,ओम अविनाश माळी,जिवन महाजन,दत्तामय महाजन,रमेश महाजन,विजय महाजन,मनोज देशमुख,बबलू महाजन,अविनाश महाजन,रामगोपाल सैनी,दिनेश महाजन,सुकलाल महाजन,अनिल महाजन यांच्यासह समाज बांधवांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमांचे सूत्रसंचलन प्रविण महाजन तर आभार गोकुळ महाजन यांनी मानले.