Just another WordPress site

शेळगाव बॅरेज प्रकल्पाच्या नागरी वाहतुक पुलाच्या कामास गती मिळावी-शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांचे मुख्यमंत्र्यांकडे साकडे !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२६ जुलै २५ शनिवार

यावल तालुक्यासाठी महत्वकांशी असणाऱ्या शेळगाव बॅरेज मध्य प्रकल्पाचे काम पुर्णत्वाकडे गेले असुन याच मार्गाने यावल तालुक्याला जळगाव जिल्ह्याच्या बाजारपेठेला जोडणाऱ्या नागरी वाहतुक पुलाचे बांधकाम संथगतीने होत असल्याने परिसरातील नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत असुन या कामास राज्य शासनाने भरीव असा निधी उपलब्ध करून सदरील कामास लवकरात लवकर अंतीम रूप मिळण्याबाबत शासनस्तरावरून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी नुकतीच केली आहे.

दरम्यान यावल तालुक्याच्या विकासाला जळगाव शहराच्या बाजारपेठच्या माध्यमातुन मोठी संधी व दिशा देउन दळण वळणाचे आगळे वेगळे मार्ग खुले करणाऱ्या शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाच्या नागरी वाहतुक पुलाचे काम हे गेल्या तिन वर्षापासून निधीअभावी अत्यंत संथगतीने सुरू असल्याने परिसरातील नागरीकांमध्ये शेळगाव बॅरेजच्या कामास झालेला अनेक वर्ष विलंब व आता नागरी वाहतुक पुलास निधीअभावी शासनाच्या संथगती कारभारावर नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.सदरहू शेळगाव बॅरेजच्या नागरी पुल बांधणीला भरीव निधी मिळुन पुलाच्या कामास गती मिळावी या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार व शिवसेना पक्ष प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्र पाठवुन मागणी करणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.