यावल-भुसावळ महामार्गावरील धोकादायक खड्डे दुरूस्तीचा मुहूर्त सापडला !! माजी नगरसेवक उमेश फेगडे यांच्या पाठपुराव्याला यश !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२८ जुलै २५ सोमवार
येथील नगर परिषद प्रशासनाला माजी नगरसेवक उमेश फेगडे यांनी यावल-भुसावळ महामार्गावरील आयशानगर वस्तीच्या रस्त्यावर असलेल्या खड्डयांमुळे होणाऱ्या संभाव्य अपघाताची प्रशासनाला जाणिव करून दिल्याने वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक वाटणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्ती कामास प्रशासनाने प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की,यावल शहरातील नगर परिषदच्या कार्यक्षेत्रात विस्तारित वसाहतीमध्ये असलेल्या फालक नगरच्या आयशानगर वस्तीच्या मार्गावरील यावल भुसावळ रस्त्याच्या बाजुला असलेल्या वळणावर मध्यभागी नगरपरिषद प्रशासनाच्या गटारी स्वच्छ करण्याच्या नावाखाली मागील सात महीन्यांपासून दोन मोठ मोठी खड्डे खोदुन ते दुरुस्त न करता सोडून देण्यात आली होती. दरम्यान असे असतांना नगरपरिषदच्या खोदलेल्या खड्डयांमध्ये काही दुचाकी मोटरसायकल वाहनधारकांचे अपघात देखील झाले होते.याबाबत भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उमेश रेवा फेगडे यांनी ही गंभीर बाब ‘पोलीस नायक” न्युजच्या माध्यमातुन प्रशासनाच्या निर्देशनात आणुन दिल्याने मागील सात महीन्यापासून निद्रिस्त अवस्वथेत असलेल्या नगरपरिषद प्रशासनाला जाग आणून दिल्याने अखेर या रस्त्याच्या दुरुस्ती कामास सुरुवात करण्यात आली आहे.दरम्यान या रस्त्यावरील खड्डे कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाल्याने परिसरातील नागरीकांनी भारतीय जनता पक्षाचे उमेश जावळे यांचे आभार मानले आहे.