Just another WordPress site

शेळगाव बॅरेज पुलावरून जळगाव मार्गे जाण्यास रूग्ण रुग्णवाहिकेला मंजुरी !! नितिन सोनार यांच्या प्रयत्नांना यश !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ जुलै २५ मंगळवार

यावल ते जळगाव शहराला अल्पवेळेत जोडणाऱ्या शेळगाव बॅरेजच्या मार्गावरील पुलावरून रूग्ण असलेल्या रुग्णवाहीकेला सोडण्यात यावे या जनहिताच्या दृष्टीने मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी केलेल्या मागणीला यश मिळाले असून शेळगाव बॅरेज पुलावरून जळगाव मार्गे जाण्यास रूग्ण रुग्णवाहिकेला मंजुरी देण्यात आली असल्याबाबतची माहिती शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी नुकतीच दिली आहे.

या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता भुषण अहिरे यांना केलेल्या मागणी संदर्भातील दिलेल्या निवेदनात म्हटले होते की,मागील अनेक वर्षापासून यावल तालुक्यातील विविध गावातुन सर्पदंश झालेले,विष प्राशन केलेले किंवा अपघातात गंभीर जखमी झालेले रूग्ण यांना पुढील उपचारासाठी रूग्णवाहीकेच्या माध्यमातुन जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घेवुन जावे लागते.दरम्यान यावल ते भुसावळ मार्ग जळगाव असो किंवा यावल ते विदगाव मार्ग जळगाव असो या मार्गाने रूग्णवाहीका या रुग्णांना घेवुन जात असते व अशा प्रसंगी जळगाव जाणारे दोघही मार्ग हे एक ते दिड तासांचा वेळ घेणारी असुन अशा प्रसंगी रूग्ण वाहिकाही वेळेवर पहोचत नसल्या कारणांने रूग्णांचे वेळेवर उपचार होत नसल्याने अनेक रूग्णांचा वाटेतच जिव गेलेला आहे किंवा जातो.दरम्यान नितिन सोनार यांनी पाटबंधारे विभागाचे अभियंता अहिरे यांची भेट घेवुन शेळगाव बॅरेज वरील पुलावरून किमान रुग्णवाहीका जाण्याची परवानगी मिळाल्यास अनेकांचे जिव वाचतील अशी माहिती देवुन रूग्णवाहीका सोडण्याची निवेदनाव्दारे विनंती केली होती सदरहू या विनंतीला प्रतिसाद देत पाटबंधारे विभागाच्या वतीने शाखा अभियंता भुषण अहिरे यांनी जनहिताच्या दृष्टीने यावल ते जळगाव शेळगाव बॅरेजच्या पुलावरून रुग्णवाहीका सोडण्यात येतील अशी सुचना संबधीतांना देण्यात आल्याचे मान्य केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.