यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ ऑगस्ट २५ बुधवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय रसायन शास्त्राचे जनक प्रफुल्ल चंद्रा राय यांच्या जन्मदिनानिमित्त ‘रसायनशास्त्र दिन’ साजरा करण्यात आला.महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.एच.जी.भंगाळे होते तर प्रमुख वक्ते उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार हे होते.
दरम्यान प्रमुख वक्ते प्रा.खैरनार यांनी प्रफुल्ल चंद्रा राय यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला.राय यांनी भारतीय औषध संशोधनासाठी मोलाचे कार्य केले व त्यांनी संपूर्ण आयुष्य देशाच्या योगदानासाठी व्यतीत केले.भारतात प्रथम फार्मासिटिकल कंपनीची उभारणी कलकत्ता शहरात केली.प्रथम त्यांनी नाईट्राइल चा शोध लावून पुढे याचा उपयोग विविध औषधांमध्ये उपयुक्त ठरला.यावेळी डॉ.भंगाळे यांनी आपल्या मार्गदर्शनात समाजासाठी उपयोगी असलेल्या संशोधनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.समस्या ही शोधाची जननी आहे.विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांना वाव देऊन प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले.यावेळी प्रफुल चंद्रा राय यांच्या यांच्या जीवनपटावर चित्रफित उपस्थित विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.डी.पवार यांनी केले तर आभार प्रा. रूपाली शिरसाठ यांनी मानले.यावेळी प्रा.प्रतिभा रावते,प्रा.नरेंद्र पाटील,डॉ.वैशाली कोष्टी,प्रा.पी.व्ही. मोरे,प्रा.आर.व्ही.निंबाळकर,प्रा.एन.एस.जगताप यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.