यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ ऑगस्ट २५ शनिवार
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.महाविद्यालयातील एन.एन.एस.विभाग,विद्यार्थी विकास व आदिवासी सहाय्यता कक्ष विभागामार्फत आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार होते तर प्रमुख वक्ते धनाजी नाना महाविद्यालय येथील प्रा.एस.के.पाडवी हे होते.
दरम्यान प्रमुख वक्ते प्रा.एस.के.पाडवी यांनी आज दि.९ ऑगस्ट शनिवार रोजी जागतिक आदिवासी दिन या निमित्ताने आदिवासी लोकांच्या हक्कांचे,संस्कृतीचे आणि अस्तित्वाचे महत्व जगाला दाखवण्याचा दिवस आहे.जगभरातील आदिवासी समुदाय त्यांची संस्कृती,परंपरा आणि ज्ञान वारसा,हे मानवी इतिहास आणि जैवविविधतेचा एक अविभाज्य भाग आहेत त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून आपण त्यांच्या योगदानाचा गौरव करणे आणि त्यांच्यासमोर येणारे आव्हानांवर विचार करणे आवश्यक आहे.आजच्या काळात आदिवासी समुदायांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.जमिनीवरील त्यांचे हक्क,नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे त्यामुळे त्यांचे हक्क आणि न्याय सुनिश्चित करणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे असे सांगितले.तर यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उप प्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी आपण सर्वांनी आदिवासी लोकांच्या हक्कांचा आदर केला पाहिजे.त्यांच्या संस्कृतीच्या सन्मान केला पाहिजे आणि त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे व यासाठी शिक्षण,आरोग्य आणि आर्थिक संधीमध्ये समानता मिळवून देणे आवश्यक आहे.आजच्या या विशेष दिवशी आपण सर्वांनी मिळून असा संकल्प करूया की आपण आदिवासी समुदाया सोबत त्यांचे हक्कांसाठी आणि त्यांचे उज्वल भविष्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा.सी.टी.वसावे यांनी केले तर आभार डॉ.एच.जी. भंगाळे यांनी मांनले.यावेळी प्रा.डॉ.पी.व्ही.पावरा,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.प्रतिभा रावते,प्रा.अरुण पावरा कार्यक्रम यशस्वितेसाठी सहकार्य केले.कार्यक्रमासाठी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.