Just another WordPress site

निंबोल येथील पाण्याच्या टाकीच्या नित्कृष्ट कामाची कनिष्ठ अभियंत्याकडून चौकशी !!

संदीप धनगर,पोलीस नायक

निंबोल ता रावेर (प्रतिनिधी) :-

दि.११ ऑगस्ट २५ सोमवार

येथील बौद्ध समाज बांधवांकरिता पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले असून सदरील टाकीचे बांधकाम हे फारच नित्कृष्ट प्रतीचे करण्यात आलेले असल्याने याबाबत सदरील कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप धनगर यांनी गटविकास अधिकारी रावेर यांच्याकडे केली होती.त्यानुसार रावेर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता दीपक भोये व भूषण पाटील यांच्या वतीने सदरील कामाची चौकशी करण्यात आली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते संदीप धनगर यांनी कळविले आहे.

दरम्यान निंबोल गावातील बौद्ध समाजाच्या बौद्ध विहारालगत दलित वस्तीमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले असून सदरील काम अतिशय नित्कृष्ट प्रतीचे करण्यात आले असून इस्टिमेट नुसार बांधकाम करण्यात आलेले नसून सदर कामाचा संपूर्ण निधी हा वापरला गेला असून पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण अवस्थेत पडून आहे.परिणामी सदर कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप धनगर यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या अर्जाद्वारे केली होती.सदरहू सामाजिक कार्यकर्ते संदीप धनगर यांच्या अर्जाची दखल गटविकास अधिकारी रावेर यांच्याकडून घेण्यात आली असून दि.७ ऑगस्ट २५ रोजी रावेर पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता दीपक भोये व भूषण पाटील यांच्या वतीने रिससर चौकशी करण्यात आली असून सदर अहवाल काही दिवसात मिळेल असे सांगण्यात आले आहे.यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी डिगंबर धनगर,ग्रामपंचायत सदस्य राहुल गुरुजी,अर्जदार सामाजिक कार्यकर्ते संदीप धनगर,विनोद कोळी,मुनाफ टेलर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.