यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ ऑगस्ट २५ मंगळवार
तालुक्यातील किनगाव व परिसरासह आदिवासी पाड्यांवर ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस’ मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.आदिवासी बाधवांचा आत्मसन्मान जपणाऱ्या आणि अस्मिता फुलवणाऱ्या या जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने दरवर्षी ९ आँगष्ट हा दिवस जगभरातील आदिवासी बांधव ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून साजरा करतात.संयुक्त राष्ट्र संघटनेने हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिवस’ म्हणून घोषित केल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.किनगाव येथे जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विविध कलागुण दर्शन व समाज प्रबोधनाचे कार्येक्रमांचे आयोजन तडवी पंच कमेटी किनगाव,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली,तडवी एकता मंच व आदिवासी एकता परिषद यांचे मार्फत करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी होते.प्रसंगी उमाकांत(छोटु आबा) रामराव पाटील,इंग्लिश स्कूलचे सचिव मनिष पाटील,मुनीर तडवी,सरपंच स्नेहलता चौधरी,उपसरपंच अलानूरताई लुकमान कलंदर तडवी,भुसावल न पा चे कर्मयारी अय्युब तडवी,पंचक येथील सरपंच बिस्मिल्ला तडवी,लोणी येथील उपसरपंच शबाना तडवी, आदिवासी कांग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष जफरउल्ला जमादार,अखिल भारतीय आदिवासी विकास युवक सेलच्या महिला सचिव मीना तडवी,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजू तडवी,युवा महानिरीक्षक रोनक तडवी,जिल्हाध्यक्ष मुरात तडवी,शाखाध्यक्ष अनिस तडवी,राजीव गांधी फाउंडेशन सचिव फातमा मुनीर तडवी,समीर तडवी,अनिस तडवी,रफिक तडवी अशोक भील,किरण सोनवणे,भूषण साळुंखे,सुधाकर सावकारे,सूर्यभान पाटील,मांडेवाल सर,जुम्मा तडवी,भाजपचे अनिल पाटील व संजय पाटील इ.मान्यवरांच्या हस्ते थोर क्रांतीकारी भगवान बिरसा मुंडा,छत्रपती शिवाजी महाराज,वजीर बाबा,विर एकलव्य,खाजा नाईक व तंट्या भिल यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
दरम्यान वाद्याच्या गजरात गावातून मिरवणूकही काढण्यात आली व विविध आदिवासी क्रांतीकारींच्या वेशभूषा परीधान करून आदिवासी खेळ व आदिवासी नृत्य सादर करण्यात आले.प्रसंगी आदिवासी तरुण व महिलांनी पारंपरिक वेशभुषा परीधान करत आदिवासी संस्कृतीचे दर्शन दिले.तसेच आदिवासी तडवी भिल समाजाच्या विवाह पद्धतीचे जिवंत देखावे तयार करण्यात आले स्टेट बँक चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी केले.किनगाव ग्रामपंचात चौकात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.तसेच आदिवासी दिनाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रम अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवक सेल नवी दिल्ली संघटनेच्या वतीने ४२ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संम्पन्न झाला याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महानिरीक्षक रोणक तडवी,जिल्हाध्यक्ष मुराद तडवी,यावल तहसीलचे सखावत तडवी,लुकमान तडवी,अनिस तडवी,अशोक भिल,खलील तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.तर रेहान मुनीर तडवी,आदित्य तडवी याने बिरसा मुंडा यांची तर इरफान युनूस तडवी याने तंट्या मामा यांची वेशभूषा परीधान करत त्यांच्या जिवनावर आधारीत मनोगत व्यक्त केले व विविध आदिवासी क्रांतीकारकांचे देखावे सादर केले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आदिवासी गीतांवर नृत्य सादर केले.यावेळी शाखा अध्यक्ष अनिस तडवी,शाखा सचिव शरीफ तडवी,उपाध्यक्ष अझर तडवी, सल्लागार लुकमान तडवी,सलीम तडवी,अशोक भील,सतीश बारेला इ.सह परिसरातील पाड्या वस्तीवरील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्येक्रम यशस्वीतेसाठी खलील तडवी,फकिरा तडवी,अझर तडवी,समीर तडवी,अशोक भील,सबदर तडवी,राजू तडवी,लतीफ तडवी,फिरोज तडवी,गणेश भील,सुधाकर भील,आनंदा भील,सतीश बारेला,जनाराम बारेला,बाळू बारेला,स्वप्निल बारेला,सोहेल तडवी,दिशान तडवी,गोलू तडवी,साहिल तडवी,अमीन तडवी,समस्त तडवी नोकरदार वर्ग व सामाजिक कार्यकर्त्यांनी आर्थिक मदत करून सहकार्य केले तसेच आदिवासी समाज बांधवांनी परिश्रम घेतले.