यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ ऑगस्ट २५ मंगळवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे महादेव मारोती मंदिरावर पंचवटी श्री विठ्ठल मंदिर व समस्त गावकऱ्यांच्या वतीने काल दि.११ ऑगस्ट सोमवार रोजी वरुण राज्याने कृपादृष्टी केल्यामुळे आनंदोत्सव साजरा करत महादेव पिंड व हनुमान अभिषेक तसेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला.
गेल्या अनेक दिवसापासून डोंगर कठोरा गावावर व परिसरात पाऊस नसल्यामुळे पिके कोमेजू लागली असतांना शेतकरी कमालीचा चिंताक्रांत असतांना नुकताच वरुणराजा प्रसन्न होऊन पाऊस बारसल्यामुळे यानिमित्ताने आनंदोत्सव साजरा करतांना येथील श्री पंचवटी विठ्ठल मंदिराच्या वतीने व समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीत महादेव पिंड,हनुमान,गणपती व रुख्मणी माता अभिषेक तसेच महिलांचा हळदी कुंकू व भाजनादी कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी रवींद्र पाटील,दत्तात्रय गुरव,शालिक झोपे,दगडू पाटील,प्रकाश पाटील,दिनकर पाटील,धिरज भोळे,मधुकर पाटील,धर्मा बाऊस्कर,ज्ञानदेव पाटील,हेमंत सरोदे,संजय सरोदे,चांगदेव पाटील,डालू फेगडे,अशोक राणे,रामदास खडके,नारायण फेगडे,पांडुरंग जावळे,लिलाधर पाटील,रेवानंद पाटील,प्रवीण गाजरे,पुष्पक मुऱ्हेकर,जयश्री पाटील,शालिनी गुरव,कांचन सरोदे,सुवर्णा राणे,योगिता सरोदे,छाया भोळे,वंदना रडे,आरती पाटील,रेखा जावळे,छाया जंगले,उर्मिला पाटील,लतिका पाटील,लता भिरूड,कविता जंगले,कुसुम जंगले,रुपाली जावळे,लेखा भिरूड,मंगला खडसे यांच्यासह महिला-पुरुष भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.