Just another WordPress site

जागतिक आदिवासी दिनानिमित्त यावल एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०६ ऑगस्ट २६ गुरुवार

येथील एकात्मीक आदिवासी प्रकल्प कार्यालयातर्फे जागतिक आदिवासी दिनानिमित्त दि.०९ ऑगस्ट २६ रविवार रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यात रानभाज्या मेळाव्याचे आयोजन तसेच स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या पारंपरिक,पोषक व औषधी गुणधर्मयुक्त रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे व त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘रानभाज्या मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.यापूर्वी कार्यालयामार्फत बचत गटांना मोह फुलापासून पदार्थ तयार करणे,सोलर ड्रायरद्वारे फळांची पावडर,आदिवासी वारली पेन्टिंग या उद्योगांसाठी अर्थसहाय्य दिले असून त्यांचे स्टॉल येथे लावण्यात येणार आहेत.

दरम्यान राणी दुर्गावती योजने’ अंतर्गत लाभ मिळवलेल्या ५ महिला लाभार्थी आपली यशोगाथा सादर करतील व सन २५-२६ मधील यशस्वी लाभार्थ्यांचा गौरव तसेच इयत्ता १o वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना राघोजी भांगरे गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.त्याचबरोबर आदर्श आश्रम शाळा,आदर्श वसतीगृह,अधिकारी, गृहपाल,मुख्याध्यापक व अधीक्षक यांचा गुणगौरव कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान या निमित्ताने रानभाज्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असुन या मागचे स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या पारंपारिक पोषक व औषधी गुणधर्मयुक्त रानभाज्यांचे महत्व लोकापर्यंत पहोचवणे व बाजारपेठेत उत्पादकांना उपलब्ध करून देण्यासाठी रानभाज्या मेळावा आयोजीत करणे हा उद्देश आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत क्षेत्रातील सर्व अर्थसहाय्य मिळवलेल्या महिलांना व बचत गटांच्या महिला सदस्यांना आपल्या बचत गटाचे स्टॉल लागणार आहे.तरी परिसरातील बचत गटाच्या महीलांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी अरूण प्रभाकर पवार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.