Just another WordPress site

पिंपरूड आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिनानिमित्त ११ ऑगस्ट रोजी महिला बचत गट मेळावा व आरोग्य शिबिर !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०६ ऑगस्ट २६ गुरुवार

येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलच्या वतीने जागतिक आदिवासी दिना निमित्ताने दि.११ ऑगस्ट २६ मंगळवार रोजी सकाळी १० वाजता तालुक्यातील पिंपरुड येथील पंडीत दिनदयाल अनुदानित आश्रमशाळेत महीला बचत गट मेळावा आणि आरोग्य शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचा उद्देश अनुसूचित जमातीतील महिलांचा सर्वांगीण विकास,सामाजिक आर्थिक सक्षमीकरण आणि स्वावलंबी बनवणे आहे असून जास्तीत जास्त महिला बचत गटाच्या महिलांनाही याचा लाभ घ्यावा असे आवाहन कात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावलच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान यावल व रावेर तालुक्यातील आदिवासी महिला बचत गटांसाठी विशेष आयोजन करण्यात आले असून मातृ वंदना व घरकुल योजन घरकुल योजनेत तयार झालेल्या घरांची चावी व प्रमाणपत्र वाटप मातृवंदना योजनेच्या लाभार्थी महिलांचा सन्मान तज्ज्ञ अधिकारी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच महिला बचत गटांना बचत गट व्यवस्थापन कार्यक्षम स्थापना,बँकलिंकेज,लेखा परीक्षण ब्रँडिंग व मार्केटिंग सरकारी योजना आदिवासी विकास,महिला व बाल विकास विभागाच्या योजना कशा मिळवायच्या,स्वरोजगार लघुउद्योग गृहउद्योग,कौशल्य प्रशिक्षण व रोजगार संधी मातृवंदना योजना व कायदेशीर हक्क आर्थिक लाभ,महिलांचे हक्क व सक्षमीकरण मोफत याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.सदरील वैद्यकीय व आरोग्य तपासणी शिबिर मेळाव्यात सर्व महिला लाभार्थी व उपस्थित भगिनींची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी तसेच योग्य आहार,पोषण,स्वच्छता यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तरी यावल आणि रावेर तालुक्यातील सर्व आदिवासी महिला बचत गट सदस्य,स्थानिक महिला आणि मातृवंदना योजनेच्या लाभार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अरूण पवार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.