Just another WordPress site

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने समिती परिसरात काँक्रीटीकरणास सुरुवात !! शेतकऱ्यांनी केले निर्णयाचे स्वागत

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१८ जुलै २६ शनिवार

येथील यावल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात काँक्रीटीकरणास सुरूवात झाली असून काँक्रिटी करणामुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेती उत्पादीत धान्य व इतर उत्पादीत माल ठेवण्यासाठी सोयीस्कर ठरणार असल्याची प्रतिक्रीया सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वत्र चिखलाचे आणि घाणीचे साम्राज्य असल्याने शेतकऱ्यांना आपले शेती उत्पादित वस्तुंच्या विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीतआणल्यावर अनेक्र अडचणींना सामोरे जावे लागत होते.सदरहू शेतकऱ्यांची ही समस्या सोडविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सकारात्मक पावले उचलून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले शेती उत्पादीत धान्य,केळी व आदी मालास स्वच्छ व सुरक्षीत ठीकाणी ठेवावे याकरीता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपुत यांच्यासह सर्व संचालक मंडळाने शेतकरी हितासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला व प्रत्यक्षात कामाला सुरूवात करण्यात आली आहे.परिणामी सभापती उज्जैनसिंग राजपुत व त्यांच्या सर्व सहकारी संचालक मंडळाच्या समितीने घेतलेल्या या निर्णयाचे तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.