Just another WordPress site

जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने यावल तालुका उत्सव समिती कार्यकारीणी जाहीर !! अध्यक्षपदी प्रदीप कोळी तर उपाध्यक्षपदी निकिता कोळी यांची निवड !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१८ जुलै २६ शनिवार

येत्या ९ ऑगस्ट २६ रोजी साजरा होणारा जागतिक आदीवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी यावल शेतकी सहकारी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात आदीवासी टोकरे,ढोर,महादेव,मल्हार कोळी जमात बांधवाची बैठक समाजाचे जेष्ट नेते माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे वढोदेकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.या बैठकीत ९ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी उत्सव समिती गठीत करून कार्यक्रमाचे नियोजन करण्याविषयी चर्चा करण्यात आली.यात कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी हातभार लावावा व ९ ऑगष्टला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रभाकर सोनवणे यांनी केले.
या बैठकीत जितेंद्र सपकाळे,रोहन सोनवणे जळगाव,हरलाल कोळी रावेर,नामदेव कोळी यांनी समाजातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून समाज बांधवांना मार्गदर्शन केले.

सदर बैठकीत जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी उत्सव समिती निवड करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी भालोद येथील सरपंच प्रदिप कोळी यांची तर उपाध्यक्षपदी निकिता कोळी फैजपूर व दीपक कोळी यावल यांची निवड करण्यात आली.तर खजिनदार खेमचंद कोळी,मुकेश कोळी,प्रसिद्धी प्रमुख गोकुळ कोळी तसेच सदस्य म्हणून नितीन कोळी रावेर,मुरलीधर कोळी भुसावळ,राज पाटील भुसावळ,भागवत कोळी तांदळवाडी,किरण कोळी तासखेडा,नितीन कोळी दहिगाव, वाल्मीक कोळी राजोरा,धनराज कोळी यावल,कैलास सपकाळे अंजाळे,दीपक कोळी किनगाव,कुणाल सोनवणे बामणोद,शांताराम इंगळे चोपडा,नितीन कोळी अंजाळे, रोहिदास कोळी पीप्री,भागवत कोळी अंजाळे,महेश नन्नवरे यावल,नामदेव कोळी पाडळसा,गोपाळ कोळी यावल,भरत कोळी यावल यांची निवड करण्यात आली आहे.दरम्यान ९ ऑगस्ट रोजी रेणुका देवी मंदिर यावल येथून विविध वेशभूषा,सजीव देखावा व पारंपारिक नृत्य कार्यक्रम सादर करून आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे सदरहू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन यावल तालुका आदिवासी दिन उत्सव समितीच्या वतीने समाजाची ज्येष्ठ नेते प्रभाकर सोनवणे यांनी या बैठकीत केले.प्रास्तविक खेमचंद कोळी यांनी केले तर आभार नितीन सपकाळे यांनी केले.या बैठकीला प्रविण कोळी,संदिप सोनवणे,प्रकाश कोळी,पदमाकर कोळी,अनिल कोळी,नितीन कोळी यांच्यासह समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.