फत्तेपूर येथील भारतीय बहूउद्देशीय पत्रकार संघाच्या “राज्यस्तरिय समभाव पुरस्कार वितरण सोहळा” संदर्भात बैठक संपन्न !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.८ मे २६ शुक्रवार
भारतीय बहूउद्देशीय पत्रकार संघ महाराष्ट्रच्या वतीने आयोजीत राज्यस्तरिय समभाव पुरस्काराचे वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन फत्तेपुर तालुका जामनेर येथे आयोजीत करण्यात आला असुन या सन्मान सोहळा कार्यक्रमात पत्रकारीता,राजकारण,शैक्षणिक,समाजसेवा,प्रशासकीय सेवा व विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या ३० व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
दरम्यान भारतीय बहूउद्देशीय पत्रकार संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने फत्तेपुर तालुका जामनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय या ठीकाणी दि.१५ जुन २६ सोमवार रोजी सकाळी १० वाजता संपन्न होणार असुन या राज्यस्तरिय पुरस्कार सन्मान सोहळ्यात विविध कार्यक्षेत्रात आपल्या कतृत्वाने उत्कृष्ठ असे लक्ष वेधणारे कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देवुन सन्मान करण्यात येणार आहे.या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज दि.८ मे शुक्रवार रोजी बैठक उत्साहात संपन्न झाली.यात सर्व प्रथम जेष्ठ पत्रकार डी बी पाटील यांच्या पत्नी कुसूम पाटील व पत्रकार अय्युब पटेल यांच्या मातोश्री बिबाबी पटेल यांचे निधन झाले असून त्यांना श्रध्दांजली अपर्ण करण्यात आली.यावेळी बैठकीत फत्तेपूर येथील “राज्यस्तरिय समभाव पुरस्कार वितरण सोहळा” यशस्वी पार पाडण्याबाबत तसेच पत्रकारांशी संबंधीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.प्रसंगी पत्रकार संघाचे राज्याचे प्रभारी अय्युब पटेल यांच्यासह सचिव जिवन चौधरी,कार्यध्यक्ष विजय जोशी,महाराष्ट्र राज्य ग्रामीण क्षेत्राचे प्रदेश विजय बन्सोड,विभागीय अध्यक्ष चंद्रकांत पाटील,अय्युब पटेल,अलीम चाऊस, विजय कुलकर्णी,मुन्ना शेख,विजय काळे,श्याम मोराणकर,गणेश जाधव,सलीम पटेल,मराठवाडा क्षेत्र प्रमुख मोहम्मद अबूबकर,राजेश कुलकर्णी,शेखर खाटीक,फिरोज शाह,राजेन्द्र मराठे,सुनिल पिंजारी,बाळासाहेब आढाळे,सुभाष कोळी,रवि कोलते,अनिल न्याहळदे,रमेश बेलसरे,हर्षल आंबेकर,फिरोज तडवी,एजाज पठाण,रणजीत भालेराव,प्रदीप सिसोदिया,रावण ठाकरे आदी पत्रकार प्रयत्न करीत आहे.