यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ ऑगस्ट २६ शनिवार
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने राबविण्यात येणाऱ्या ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत यावल तालुका सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा गावाचे प्रथम नागरिक वढोदा ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे यांच्या वाढदिवसा निमित्त वढोदा येथे वृक्षारोपण करण्यात आले.

सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे यांच्या निवासस्थानी वृक्षारोपण करून उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर जिल्हा परिषद शाळा तसेच गावातील विविध ठिकाणी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर (आप्पा) सोनवणे,ग्रामपंचायत सदस्य,पोलीस पाटील,जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक,रोजगार सेवक तसेच गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.