संविधान दिन इतिहास अणि महत्व
संविधान दिन इतिहास अणि महत्व
संविधान दिन (कन्सटिटयुशन डे) कशाला म्हणतात?
संविधान दिनाला इंग्रजीत कन्सटिटयुशन डे असे म्हणतात.
कन्सटिटयूशन डेला मराठीत “राष्ट्रीय विधी दिन कायदा दिन” ह्या नावाने देखील संबोधिले जात असते.
संविधान दिवस भारतात कधी अणि केव्हा साजरा केला जातो?
संविधान दिवस दरवर्षी भारतात २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जात असतो.
२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणुन का साजरा केला जात असतो?
२९ आँगस्ट १९४७ रोजी आंबेडकराच्या नेतृत्वामध्ये संविधानाची निर्मिती करायला एक मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती.
अनेक बैठका झाल्या चर्चासत्र घडुन आली त्यानंतर मसुदा समितीकडुन सादर करण्यात आलेला मसुदा संविधान सभेकडुन २६नोव्हेंबर१९४९ रोजी औपचारीक पदधतीने स्वीकारण्यात आला होता.
म्हणुन २६ नोव्हेंबर हा दिवस संपुर्ण भारतात दरवर्षी संविधान दिवस म्हणुन साजरा करण्यात येत असतो.
संविधान दिन इतिहास अणि महत्व
घटनेच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा असणारया भारतीय संविधानाचे जनक तसेच घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी तसेच त्यांना श्रदधांजली अपर्ण करण्यासाठी घटनेच्या निर्मितीत त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणुन संपुर्ण भारतात हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
भारत सरकारकडुन बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त श्रदधांजली वाहण्याकरीता २०१५ मध्ये २६ नोव्हेंबर रोजी प्रथम अधिकृत संविधान दिन साजरा केला गेला होता.
भारतीय संविधान दिनाचे उददिष्ट
संविधान दिन हा दिवस भारतीय संविधानाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याकरीता तसेच आंबेडकरांच्या विचारांचा जगभरात प्रसार करण्याच्या उददिष्टाने दरवर्षी संपूर्ण भारतात मोठया आनंदात अणि जल्लोषात साजरा केला जात असतो.
महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडुन २४ नोव्हेंबर २००८ रोजी एक फरमान जारी करण्यात आला होता ज्यात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणुन साजरा केला जाईल असे घोषित करण्यात आले होते.
आजच्या माँडर्न कल्चर मध्ये राहणारया पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब करणारया देशाच्या तरूण पिढीमध्ये संविधानाची मुल्ये रूजवण्याकरीता दरवर्षी सर्व भारतीय मिळुन हा दिवस साजरा केला जात असतो.
भारताचे संविधान कधी अणि केव्हा लागु झाले होते?
२६ नोव्हेंबर रोजी समितीने सादर केलेला मसुदा संविधान सभेने स्वीकारला होता अणि २६ जानेवारी १९५० रोजी ह्या संविधानाला लागु करण्यात आले होते.
भारताचे संविधान तयार करायला साधारणत किती कालावधी लागला होता?
-: संकलन :-
बाळासाहेब व्ही.आढाळे.
पोलीस नायक मुख्य संपादक
मो.नं.-८३२९४८१०५०