यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक व पंचक्रोशीतील प्रसिद्ध तसेच असंख्य हिंदु मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत मलंगशाह बाबा उर्स दि.१२ व दि.१३ डिसेंबर २२ रोजी साजरा करण्यात येणार असुन या निमित्ताने कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
किनगाव तालुका यावल येथील परिसरात प्रसिद्ध असलेल्या हजरत मलंगशाह बाबा यांच्या दर्गावरील उर्स ( यात्रा ) यंदा दोन वर्षाच्या कोरोना संकटाच्या हद्दपारीनंतर प्रथमच मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा होत आहे.यानिमित्ताने सोमवार दि.१२ डिसेंबर रोजी संदल कार्यक्रम व मंगळवार दि.१३ डिसेंबर रोजी ‘ख्वाजा तेरी बस्ती मे रहेमत बरसती’ फेम मुंबईचे प्रसिद्ध कव्वाल अजिम नाजा व फरूकाबाद कानपुरच्या प्रसिद्ध फनकारा करिष्मा ताज यांच्या जुगलबंदीचा भव्य असा कव्वालीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी पंचक्रोशितील सर्व धर्मिय भाविकांनी दर्गावरील दर्शन संदल व कव्वातीच्या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन किनगाव येथील हिन्दु मुस्लीम एकता कमेटी,बिरसा मुंडा ग्रुप,तडवी साहेब ग्रुप,आर एस ग्रुप, न्यु फायटर ग्रुप,बेस्ट ईलेव्हन ग्रुप,शेरे सुलतान ग्रुप,हसमती ग्रुप,ग्रीन टायगर ग्रुप,सेवन स्टार ग्रुप,सरकार ग्रुप,किक ग्रुप व लब्बेक ग्रुप यांच्या वतीने करण्यात आले आहे .