Just another WordPress site

पोलिसांना विनाकारण त्रास देण्याकरीता वृद्धाने केले ९ दिवसांत २ हजारांवर फोन !!

जपान-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

एका वृद्ध व्यक्तीने ९ दिवसांमध्ये विनाकारण पोलिसांना जवळपास २ हजारांहून अधिक फोन केल्याची विचित्र घटना उघडकीस आली आहे. शिवाय हा वृद्ध व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये फोन करून तेथील पोलिसांना शिवीगाळ करायचा.त्यामुळे या वृद्ध व्यक्तीना आता पोलिसांनी अटक केली आहे.शिवाय तपासादरम्यान ही वृद्ध व्यक्ती अनेक वर्षांपासून पोलिसांना विनाकारण त्रास देत असल्याचेही उघडकीस आले आहे. मात्र अलीकडच्या काही दिवसांमध्ये त्याचे फोन करण्याचे प्रमाण वाढले होते.सदरील घटना ही जपानमधील असून या घटनेतील आरोपीचे वय ६७ वर्ष आहे.हा आरोपी सैतामा प्रीफेक्चरल पोलीस स्टेशनमध्ये वारंवार फोन करून पोलिसांना नको ते बोलायचा.धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीने केवळ ९ दिवसांत २ हजार ६० वेळा कॉल केले होते.एवढच नव्हे तर ही व्यक्ती पोलिसांना कर चोरी करणारे तर कधी मुर्ख म्हणायचा.शिवाय तो पोलिसांना कामावरुन काढून टाकण्याची मागणीही करायचा.या आरोपीने ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या काळात पोलिसांना हजारांवर फोन केले तो दर ६ मिनिटांनी एक फोन करायचा.त्याच्या या सततच्या फोनमुळे पोलिसांची हेल्पलाइन सेवा विस्कळीत व्हायची शिवाय महत्वाचे फोन व्यस्त लागण्याचा प्रकार घडायचा.

पोलिसांनी या आरोपीला २८ नोव्हेंबर रोजी अटक केल्यानंतर त्याने सर्व आरोप मान्य केले.शिवाय एक दिवस पोलिस मला पकडण्यासाठी येतील हे मला माहित होते असेही तो म्हणाला मात्र तो फोन का करायचा यामागचे कारण काही त्याने सांगितलेले नाही.पण पोलिसांना केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने फोन केल्याचा संशय पोलिसांना आहे.आरोपीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता तो अनेक वर्षांपासून हे कृत्य करत असल्याचे उघडकीस आले आहे.दरम्यान २०१९ मध्ये अशीच एक घटना घडली होती.त्या घटनेत एका ७१ वर्षीय व्यक्तीने त्याच्या टेलिकॉम प्रोव्हायडरला तब्बल २४,००० फोन करत शिवीगाळ केली होती.त्यामुळे त्याच घटनेची ही पुनरावृत्ती आता झाल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.