Just another WordPress site

राज्यभरातील ७,१३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ७४ टक्के मतदान;उद्या मतमोजणी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राज्यभरातील ७,१३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे ७४ टक्के मतदान झाले.यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.सर्वत्र मतदान शांततेत पार पडल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.मतमोजणी मंगळवारी  २० डिसेंबर रोजी होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती.त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या त्यामुळे काल प्रत्यक्षात ७ हजार १३५  ग्रामपंचायतींसाठी  मतदान झाले.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या

ठाणे-३५,पालघर-६२,रायगड-१९१,रत्नागिरी-१६३,सिंधुदुर्ग-२९१,नाशिक-१८८,धुळे-११८,जळगाव-१२२,अहमदनगर-१९५,नंदुरबार-११७,पुणे- १७६,सोलापूर-१६९,सातारा-२५९,सांगली-४१६,कोल्हापूर-५२९,औरंगाबाद-२०८,बीड-७७१,नांदेड-१७०,उस्मानाबाद-१६५,परभणी-११९, जालना-२५४,लातूर-३३८,हिंगोली-६१,अमरावती-२५२,अकोला-२६५,यवतमाळ-९३,बुलडाणा-२६१,वाशीम-२८०,नागपूर-२३४,वर्धा-१११, चंद्रपूर-५८,भंडारा-३०४,गोंदिया-३४५,गडचिरोली-२४ असे एकूण – ७१३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाचा कार्यक्रम पार पडला.असे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.