योगेश पाटील
रावेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
झारखंड राज्यातील गिरडीह जिल्ह्यातील जैन धर्मियांचे पवित्र स्थान श्री संम्मेद शिखरजी हे असून तेथील सरकार हे पवित्र तीर्थक्षेत्र स्थानाला पर्यटन स्थळ करू इच्छिते आहे त्यामुळे त्या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राहणार नाही कारण त्याठिकाणी हॉटेल्स व मास मच्छी विक्री व मासाहार केला जाईल त्यामुळे जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट होईल व आमच्या भावना दुखावल्या जातील.याच्या निषेधार्थ तालुक्यातील जैन धर्मिय बांधवांच्या हस्ते तहसीलदार व पोलीस निरीक्षक रावेर यांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,झारखंड राज्यातील गिरडीह जिल्ह्यातील जैन धर्मियांचे पवित्र स्थान श्री संम्मेद शिखरजी हे असून तेथील सरकार हे पवित्र तीर्थक्षेत्र स्थानाला पर्यटन स्थळ करू इच्छिते आहे त्यामुळे त्या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राहणार नाही कारण त्याठिकाणी हॉटेल्स व मास मच्छी विक्री व मासाहार केला जाईल त्यामुळे जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट होईल व आमच्या भावना दुखावल्या जातील.सदर घटनेच्या निषेधार्थ रावेर येथील सर्व समाज बांधव यांच्या वतीने निवेदन देत आहोत तरी आमच्या धार्मिक भावनांचा विचार करून केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी पर्यटनस्थळ घोषित करण्याचा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा हि जैन अल्पसंख्याक बहुउद्देशीय संस्था व सकल जैन समाज रावेर याच्यातर्फे विनंतीपूर्वक निवेदनात मागणी करण्यात आली आहे.याबाबत निर्णय मागे न घेतल्यास सकल जैन समाज संबंधित राज्य शासनाच्या विरोधात संविधानिक मार्गाने लढा चालू ठेवेल अशा प्रकारचे निवेदन जैन समाज रावेर तालुक्याच्या वतीने देण्यात आले. यावेळी नितीन विलास सैतवाल,दिलीप बाहुबली मूळकुटकर,कैलास दत्तत्रेय सैतवाल,दिपक मनोहर जैन धामोडी,अक्षय विजय डोळसकर,देवेंद्र दिलीप शाह,मनोज अशोक वास्कर,महावीर नेमीनाथ जैन,विजय पुंजाजी डोळसकर,भूषण प्रकाश सैतवाल,राहुल जैन धामोडी,योगेश किशोर सैतवाल,मोहित जिनेंद्र जैन,ओजस उज्वल डेरेकर,भास्कर काशिनाथ महाजन,अमोल प्रभाकर पाटील,जितेंद्र प्रकाश सैतवाल,हेमंत भास्कर आंबेकर,संदीप मधुकर अन्नदाते,राजेंद्र पुंजाजी डोळसकर,पारस निलेश डेरेकर यांच्यासह जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.