यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
सर्वत्र मुस्लीम समाजबांधवांचा पवित्र रमजान महीन्याचा प्रारंभ झाला असुन या निमित्ताने मुस्लीम बांधवांच्या वतीने रोजे (उपवास) ठेवण्यात येत आहेत.यानिमित्त मुस्लिम समाजबांधवांकडून फज़रच्या नमाज पठणासह रोजे ठेवण्यात येतात.यात यावल शहरातील सुर्दशन चित्र मंदीर चौक डांगपुरा या परिसरात राहणारे युवा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख समद यांची चार वर्षीय चिमकुली अफीरा फातेमा हिने पवित्र रमजान महीन्यातील रोजा (उपवास) ठेवल्याने तिच्या आजीसह आई,वडील व काका काबीज शेख समद यांनी तिला आशीर्वाद दिले आहेत तसेच समाज बांधव यांच्याकडून अफीरा फातेमा हिने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.
अफीरा फातेमा या चिमुकलीस आजी,आई,वडील,काका पत्रकार काबीज शेख यांनी आशीर्वाद देऊन भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.या पाच वर्षीय अफीरा हिने रोजा (उपवास) सोडतांना अल्लाहकडे नमाज पठणातुन प्रार्थना केली आहे.