सादिक शेख,पोलीस नायक
मोताळा तालुका (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील धामणगाव बढे येथे दि.२२ रोजी मुस्लिम बांधवांचा पारंपारिक पद्धतीने पवित्र रमजान ईद सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हजारो मुस्लिम बांधवांच्या वतीने ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करून साजरी करण्यात आली.
भारत देश हा विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो आजही भारतात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहात असून आपले सण व उत्सव एकोप्याने साजरे करीत आहेत.याच अनुषंगाने धामणगाव बढे येथे दि.२२ रोजी पवित्र रमजानच्या मुहूर्तावर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांच्या वतीने आकर्षक नवीन वस्त्र परिधान करून शहरातील विविध मस्जिदमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामूहिक नमाज पठण करण्यात आले.तसेच येथील समाज बांधवांनी जामा मशिदीजवळ गोळा होऊन “अल्लाह अकबर अल्लाह अकबर” च्या घोषणा देऊन गावात गस्त घालून ईदगाह मैदानावर पोहोचले व तिथे जावेद मौलाना हाफिज सादिक यांच्या मार्गदर्शनाखाली ईदची नमाज अदा केली.नमाज अदा केल्यानंतर मौलाना जावेद पटेल यांनी सर्व देशाच्या एकता अखंडता शांती कायम राहावी यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली व नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.त्यानंतर गावात सर्व जाती धर्माचे लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमा होऊन मुस्लिम बांधवांना गळा भेट देऊन व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक गणेश सिंग राजपूत,भागवत दराखे,धनराज घोंगडे,कृष्णा गोरे,लक्ष्मण गवई,उदयभान शेलेकर,गणेश हुडेकर सर,राजू बोरसे, मुकुंदा शिरसागर व सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी वृंद यांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट व पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.