Just another WordPress site

“२० जून हा जागतिक गद्दार दिन जाहीर करा” -संजय राऊत यांचे संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;-
एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाले असून त्यांच्या या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे तसेच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे.अशातच आजचा दिवस म्हणजेच २० जून हा जागतिक गद्दार दिन जाहीर करा असे पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला लिहिले असून या पत्रावर संयुक्त राष्ट्र संघटना काय निर्णय घेणार? हे औसुक्याचे ठरणार आहे.२० जून २०२२ रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेने  रवाना झाले होते.पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे १६ आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.शिवसेनेच्या ४० आमदारांसह ५२ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.
या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.एका आमदाराने यासाठी ५० खोके (५० कोटी) रुपये घेतले त्यामुळे २० जून हा सर्व जगातील गद्दार दिन साजरा करण्यात यावा. यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल संयुक्त राष्ट्र संघटनने जाहीर केल्यानंतर २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय त्याप्रमाणे २० जून हा ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी संजय राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे.उद्धव ठाकरे यांनी वर्धापनदिनी जे भाषण केले त्या भाषणातही त्यांनी २० जून हा जागतिक गद्दार दिन आहे असे वक्तव्य केले आहे तर १८ जून रोजी जो शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात आदित्य ठाकरेंनीही हेच वक्तव्य केले होते.२० जून हा जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा केला गेला पाहिजे असे त्यांनी म्हटले होते आता संजय राऊत यांनी थेट संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहिले आहे.सदरील पत्राची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चर्चिली जात आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.