संसदीय पावसाळी अधिवेशनात काल दि.७ ऑगस्ट रोजी राज्यसभेत खासदार संजय राऊत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात वार-पटलवार झाले.नरेंद्र मोदींना परदेशात सन्मान मिळतो या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आगपाखड केली यावरून संजय राऊतांनी आज दि.८ ऑगस्ट रोजी प्रसिद्धी माध्यमांसमोर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.संजय राऊतांनी काल राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेशात सन्मान केला जातो पण तो सन्मान त्यांचा वैयक्तिक नसून महान लोकशाही परंपरा असलेल्या देशातील नेत्याचा तो गौरव असतो असे संजय राऊत म्हणाले.त्यावर अमित शाहांनी सभागृहातच त्यांना प्रत्युत्तर दिले यावरून आज राऊतांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.अमित शाहांनी माझ्या तोंडी खोटी वाक्ये टाकली आहेत. खरेतर त्यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे.मोदींचा परदेशात सन्मान केला जातोय,ही गळाभेट नरेंद्र मोद यांची नसून महान लोकशाही परंपरा असलेल्या देशाच्या नेत्याचा सन्मान असतो असे मी बोललो पण अमित शाहांनी नंतर वेगळेच जोडले.माझ्या तोंडी असे वाक्य असेल तर मी खासदारकी सोडायला तयार आहे.ते आमच्या तोंडी काहीही घालतात आणि स्वतःची टिमकी वाजवतात.महान लोकशाहीवादी देश म्हणून भारताची परंपरा आहे आणि महान लोकशाही असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गौरव होतो आणि आपण त्या लोकशाही परंपरेला काळिमा फासला आहे अशी टीकाही राऊतांनी आज केली.
आपल्या सोयीने विरोधकांच्या तोंडी वाक्य घालायचे आणि आपले ढोल वाजवायचे त्यावर मला पॉइंट ऑफ ऑर्डर घ्यायचा होता पण मला घेऊ दिला नाही.माझा आणि नितिश खरगेंचा माईक बंद केला गेला.माझी दीड मिनिटे शिल्लक होती,मला चार मिनिटेच बोलायला दिली.मी बोलण्याच्या ओघात पुण्याच्या कार्यक्रमावर जात होतो,टिळकांचा पुरस्कार मोदींना मिळाला,ती लोकशाही परंपरा मोदींनी राखली पाहिजे, असे मी बोलणार होतो तेव्हढ्यात उपराष्ट्रपतींनी माझा माईक बंद केला व मला बोलू दिले नाही ही लोकशाहीची गळचेपी आहे असा घणाघातही संजय राऊतांनी केला आहे.