डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.३ सप्टेंबर २३ रविवार
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा हे १९९२ पासुन तालुक्यातील एनबीए नामांकन व आयएसओ प्रमाणित महाविद्यालय आहे.बी फार्मसी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश क्षमता १०० जागांची असून वर्ष २०२० यावर्षापासून डी.फार्म हा अभ्यासक्रमाची विद्यार्थी प्रवेश क्षमता ६० जागांची आहे तसेच एम.फार्म फार्माकोग्नोसी व एम.फार्म फार्मासुटीक्स या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी १० जागांची क्षमता आहे तर पी.एच डी अभ्यासक्रम पण संस्थेत घेतला जातो.
महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रेरित असते.महाविद्यालयातील प्राध्यपकांनी २५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट दरम्यान आयोजित फार्माटेक एक्स्पो अँड लॅबटेक एक्स्पोला गांधीनगर गुजरात येथे शैक्षणिक भेट दिली.सदर प्रदर्शनात संपूर्ण भारतातून फार्मा उपकरणे,पॅकिंग उपकरणे,औषधनिर्माण,सौंदर्यप्रसाधने व इतर संबंधित कंपन्यांनी सहभाग नोंदवला.औषधनिर्माण क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व आधुनिकतेची सांगड घालून प्रदर्शनाच्या माध्यमातून वेळ व परिश्रम कमी करत सर्वोत्तम उपकरणांची प्रात्याक्षिके पहावयास मिळाली जे आगामी काळात विद्यार्थी व शिक्षक ह्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीकोनास पूरक ठरतील.सदर शैक्षणिक भेटीसाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील,उपाध्यक्षा आशाताई पाटील,सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील व प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे यांचे मार्गदर्शन लाभले.फार्मासुटीक्स विभागप्रमुख डॉ. भरत जैन ह्यांच्या देखरेखीखाली भेट पार पडली व प्रबंधक पी.बी.मोरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तसेच समन्वयक डॉ.कुंदन पाटील,प्रा.समीर तडवी,प्रा.विकास पाटील,प्रा.अजिंक्य जोशी,प्रा.श्रीधर बेटकर ह्यांनी प्रत्यक्ष भेटीची अनुभूती घेतली.