डॉ सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१६ सप्टेंबर २३ शनिवार
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शरद चंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात फार्मसी क्षेत्रात उपयुक्त असणारे विविध अत्याधुनिक उपकरणे वापरण्यासंबंधी कार्यशाळा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
सदरील कार्यशाळेचे उद्घाटन रिलायबल श्री इंडस्ट्रीज ट्रेनिंग सेंटरचे संचालक अनिल विसपुते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अनिल विसपुते यांनी चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रात उपयुक्त असणारे उपकरणे वापरण्याबाबत तसेच या उपकरणाचा औषध निर्माण क्षेत्रात कसा उपयोग होतो याबाबत माहिती दिली.सदर कार्यशाळेत चतुर्थ वर्षाच्या एकूण १२० विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.तर कार्यशाळेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना कल्पेश बोरसे,जयश्री बारी तसेच गार्गी पाटील यांच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले.प्रसंगी विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी कॉलेजमध्ये प्राधान्य दिले जाते असे प्राचार्य डॉ.गौतम पी. वडनेरे यांनी सांगितले.कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांकडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलचे अधिकारी प्राध्यापक डॉ.प्रेरणा जाधव,ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलचे सहाय्यक अधिकारी प्राध्यापक डॉ.रूपाली पाटील व प्राध्यापक श्रेया जैन यांनी केले.या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष ॲड.संदीप सुरेश पाटील,उपाध्यक्ष आशाताई पाटील,सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील, प्राचार्य गौतम वडनेरे,निबंधक पी.बी.मोरे व सर्व विभाग प्रमुख डॉ.बी व्ही.जैन,डॉ.एस.आर.पवार,डॉ.एम.डी.रागिब तसेच शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ.टी.वाय.शेख व टी.पी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.