Just another WordPress site

जिल्हापरिषद शाळामध्ये राबविण्यात आलेल्या “दहा दिवस गणिताचे” उपक्रमाची यशस्वी सांगता

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२२ ऑक्टोबर २३ रविवार

तालुक्यात विविध जिल्हापरिषद शाळांमध्ये नुकत्याच राबविण्यात आलेल्या “दहा दिवस गणपतीचे” त्याचप्रमाणे “दहा दिवस गणिताचे” या उपक्रमास विद्यार्थ्याचा मोठा प्रतिसाद मिळाला.

सदरील उपक्रम जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांच्या संकल्पनेतुन व डायटचे प्राचार्य अनिल झोपे,जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली यावल तालुक्यात दि.१० ऑक्टोबर २३ ते दि.२० ऑक्टोबर २३ असा दहा दिवस हा उपक्रम राबवण्यात आला.सदर उपक्रमात इयत्ता पहिली ते सातवी वर्गाचे गणित विषयाचे गणन,पूर्वतयारी,संख्याज्ञान,बेरीज,वजाबाकी,गुणाकार व भागाकार या क्रियांवर विविध उपक्रम राबवण्यात आले. दरम्यान सदर उपक्रमांमध्ये गणित पेटी,गणितीय खेळ व इतर ऍक्टिव्हिटीज घेऊन विद्यार्थ्यांचे गणिताची स्थिती सुधारण्यासाठी सदरचा उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमांतर्गत गणिताच्या मूलभूत क्षमता वाढण्यासाठी गणितातील विविध संबोध पक्के होण्यासाठी तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक तसेच शिक्षक यांनी मोठी मेहनत घेऊन हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला.या उपक्रमाची सांगता गणिताची चाचणी घेऊन करण्यात आली.या उपक्रम जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त संकल्पनेतून डायटचे प्राचार्य,शिक्षणाधिकारी प्राथमिक,शिक्षणाधिकारी माध्यमिक तसेच यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) यांच्या मार्गदर्शनाखाली गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या राबविण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.