मधुसूदन कोवे गुरुजी,पोलीस नायक
यवतमाळ जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.३१ डिसेंबर २३ रविवार
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण व्हावे अशी विदर्भातील शेतकरी,शेतमजूर,बेरोजगार,सुशिक्षित तरुण आणि व्यावसायिक व व्यापारी यांची मागणी असून यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीची १५ वर्षे पूर्ण झाली आहे.परंतु या समितीच्या मागणीबाबत केंद्र सरकारला अजुनही जाग येत नसल्याचे चित्र आहे.परिणामी जनतेचा आवाज आणि आक्रोश पाहुन २७ डिसेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनेआमरण उपोषणाचे हत्यार हाती घेण्यात येऊन जिल्ह्यातील सर्व स्तरावर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले.
या आंदोलनात सहभागी सर्व विदर्भ राज्य आंदोलन समिती,शेतकरी संघटना,स्वतंत्र भारत पक्ष,ग्राम स्वराज्य महामंच,मानव बेरोजगार समतीचे कार्यकर्ते प्रामुख्याने सहभागी झाले होते.यात कृष्णाजी भोंगाडे,जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ मधुसूदन कोवे गुरुजी, ग्राम स्वराज्य महामंच,राजेंद्र झोटींग जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना यवतमाळ,प्रा.मंजुषा तिरपुडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ,अयुब शेख राष्ट्रीय अध्यक्ष,मानव बेरोजगार समिती अक्षय महाजन,योगेश निम्रड,विजय गमे,सोनाली मरगडे,गोविंद चिंतावार,श्रीधर ढवस,नितीन ठाकरे यांच्यासह बहुसंख्येने सामान्य जनता सहभागी झाली होती.