फिनॅामीनाल म्युजीक ग्रुप आयोजित गायन स्पर्धेतील विश्वविजेते डिगंबर तायडे भक्तिरसात मग्न
डोंगर कठोरा येथील पंचवटी विठ्ठल मंदिराला श्री गणरायाची मूर्ती सप्रेम भेट देऊन फेडले मायभूमीचे पांग
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३१ डिसेंबर २३ रविवार
डोंगर कठोरा येथील सर्व लहान थोरांचे परीचीत असलेले आदरणिय सिताराम सूका तायडे (सिताराम मास्तर) यांचे चिरंजीव व सध्या डोंबिवली मुंबई येथील मुंबई प्रधीकरणात सीव्हील इंजीनीयर म्हणुन कार्यरत राहून सेवानिवृत्त झालेले डिगंबर सिताराम तायडे यांनी नुकत्याच झालेल्या फिनॅामीनाल म्युजीक ग्रुपतर्फे संपूर्ण भारतात घेण्यात आलेल्या गाण्याची प्रतीयोगीता स्पर्धेत विश्वविजेते पद पटकावून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याशा अशा डोंगर कठोरा खेडेगावातील बांधवांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता.सदरील फिनॅामीनाल म्युजीक ग्रुप आयोजित गायन स्पर्धेतील विश्वविजेते डिगंबर तायडे यांनी आज दि.३१ डिसेंबर रविवार रोजी यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील पंचवटी विठ्ठल मंदिरात श्री गणरायाची मूर्ती सप्रेम भेट देऊन जणू काही मायभूमीचे या माध्यमातून त्यांनी पांग फेडले आहे.त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय गीत गायनासोबतच भक्तिरसात देखील आपण कमी नसल्याचे त्यांनी यावेळी दाखवून दिले आहे परिणामी त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
प्रसंगी आयोजित कार्यक्रमात फिनॅामीनाल म्युजीक ग्रुप आयोजित गायन स्पर्धेतील विश्वविजेते डिगंबर तायडे यांच्या हस्ते पंचवटी विठ्ठल मंदिरात श्री गणरायाची मूर्ती विठ्ठल मंदिर ट्रस्टचे दिनकर पाटील महाराज,रवींद्र पाटील महाराज,शालिक झोपे महाराज यांना सप्रेम भेट रूपाने देण्यात आली.दरम्यान डिगंबर तायडे हे भक्तिरसात मग्न झाल्याचे दिसून आले.यावेळी त्यांनी स्वतःच्या आवाजात गायलेले दोन अभंग सादर करून उपस्थितांची मने जिंकले.या कार्यक्रमास डोंबिवली स्थित सिनिअर ऑडिटर के.डी.भालेराव,अविनाश पाठक,पंचवटी विठ्ठल मंदिर ट्रस्टचे दिनकर पाटील महाराज,रवींद्र पाटील महाराज,शालिक झोपे महाराज,माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोहर महाजन,सदू पाटील यांच्यासह बालगोपाल बहुसंख्येने उपस्थित होते.