यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ जानेवारी २३ बुधवार
महिला शिक्षणाच्या हक्कासाठी लागणाऱ्या व लढतांना शेण,विटा व दगड धोंड्यांचा मार खाऊन कर्तुत्व गाजवणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कोरपावली ग्रामपंचायतमध्ये स्री शिक्षणाचा पुरस्कार करणारी माऊली सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी सरपंच विलास अडकमोल यांनी सावित्रीबाई फुले यांचे जिवनातील संघर्ष व त्यांनी महिला शिक्षणासाठी केलेले योगदान व त्याचे महत्व समजून सांगितले.मात्र अलीकडेच्या काळात महीला स्वातंत्र संदर्भात समाजाचा स्वैराचार बदलताना दिसत आहे.हा त्या माऊलीचा अपमान नव्हे काय?असा प्रश्न उपस्थित केले.महिलांना स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्या माउलीने किती खस्ता खाल्ल्या त्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
‘खामोशी से जब भर जाओगे,तभी थोडा चीख लेना,वरना मर जाओगे!’ स्त्री मनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी दिली ती म्हणजे पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी !. त्याकाळात त्यांनी प्रवाहाविरुद्ध जाऊन स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांना व मुलींना आत्मनिर्भरतेने जगायला शिकवले अशा या स्त्री उद्धार कर्त्या सावित्रीबाई फुले यांना येथे अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी सरपंच विलास आडकमोल,आरिफ तडवी,मुराद पटेल,भरत चौधरी,पत्रकार फिरोज तडवी,अनिल इंधाटे,लिपीक किसन तायडे,शिपाई सलीम तडवी यांच्यासह ग्रामस्य उपस्थित होते.