यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील श्री विठ्ठल मंदिर पंचवटी येथे दि.२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २४ दरम्यान श्री ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंदिर कमेटीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दि.२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २४ या कालावधीत श्री विठ्ठल मंदिर पंचवटी यांच्या वतीने व श्रद्धास्थान कै.ह.भ.प.नारायण महाराज यांच्या आशीर्वादाने श्री ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर सप्ताहादरम्यान श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रवक्ते म्हणून ह.भ.प.श्री.दिनकर कडू पाटील व ह.भ.प.श्री.दत्तात्रय एकनाथ पंडित हे राहणार आहेत.सदरील कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे असून यात दि.२२ फेब्रुवारी गुरुवार रोजी कीर्तनकार ह.भ.प.श्री.मनोज महाराज ओझरखेडा,कीर्तन व अन्नदाता दिलीप पूना फिरके,दि.२३ फेब्रुवारी शुक्रवार रोजी कीर्तनकार ह.भ.प.श्री.पंकज महाराज शिरसोली,कीर्तन व अन्नदाता सुनील मुरलीधर झांबरे,दि.२४ फेब्रुवारी शनिवार रोजी कीर्तनकार ह.भ.प.श्री.संजय महाराज मोहराळा,कीर्तनदाता डिगंबर शिवराम भिरूड व अन्नदाता कमलाकर मधुकर राणे,दि.२५ फेब्रुवारी रविवार रोजी कीर्तनकार ह.भ.प.श्री.माळी महाराज वरणगाव,कीर्तनदाता श्री.रामकृष्ण हरी व अन्नदाता प्रभाकर विश्वनाथ पाटील,दि.२६ फेब्रुवारी सोमवार रोजी कीर्तनकार ह.भ.प.श्री.मनोज महाराज ऐनगाव,कीर्तन व अन्नदाता नरेंद्र किसन फिरके,दि.२७ फेब्रुवारी मंगळवार रोजी कीर्तनकार ह.भ.प.श्री.चंद्रकांत महाराज साकरी,कीर्तनदाता दिनकर माधव पाटील व अन्नदाता हिरालाल लक्ष्मण जावळे,दि.२८ फेब्रुवारी बुधवार रोजी कीर्तनकार ह.भ.प.श्री.मुकुंदा महाराज आसोदा,कीर्तन व अन्नदाता मनोहर भास्कर भिरूड,दि.२९ फेब्रुवारी गुरुवार रोजी कीर्तनकार ह.भ.प.श्री.गुरुवर्य भरत महाराज बेळीकर,कीर्तनदाता प्रशांत आनंदा भिरूड यांचे स्मरणार्थ गं.भा.विमल आनंदा भिरूड व अन्नदाता पराग सुरेश पाटील व राजेश सुरेश पाटील हे असून सदर काल्याचे कीर्तन व दिंडी सोहळा कार्यक्रम संध्याकाळी ६ ते ८ व कीर्तन ८ ते १० या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे.सदर सप्ताहास ह.भ.प.श्री.भगवान शालिकग्राम पाटील रा.डोंगर कठोरा हल्ली मुक्काम डोंबिवली यांचे अनमोल सहकार्य लाभणार आहे.तरी परिसरातील भाविक भक्तांनी या श्री.ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विठ्ठल मंदिर पंचवटी डोंगर कठोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.