यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१ मार्च २४ शुक्रवार
येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या रसायनशास्त्र विभागामार्फत विद्यार्थीनींसाठी एकदिवसीय औद्योगिक सहलीचे न्यू इरा एडिसिव्ह इंडस्ट्रीज वाघोदा तालुका यावल येथे नुकतेच आयोजन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सदर सहली दरम्यान उद्योगाची उभारणी कशा प्रकारे करावी,उद्योगाचे नियोजन,उद्योगासाठी लागणारा भांडवल खर्च, उद्योगाची उत्पादकता व उत्पादनाचे वितरण आदी माहिती तसेच कोणकोणते उत्पादन या कंपनीत तयार केले जातात व पॅकिंग कशा पद्धतीने होते अशी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनींनी जाणून घेतली.यात ईरा उद्योग समूहाचे व्यवस्थापक पारस जैन,लॅब इन्चार्ज श्रीकांत मोरे,सहाय्यक धनराज कोळी,प्रोडक्शन इनचार्ज विलास कुंभार आदींनी आपआपल्या विभागाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.प्रसंगी उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार व रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आर.डी.पवार यांनी मार्गदर्शन केले.या सहलीमध्ये कु.दिव्या निळे,सानिका सावकारे,मयुरी खंबायत,चारुशीला पाटील आदी विद्यार्थीनी आपला सहभाग नोंदवला.