श्री ठाणेदार पुढे म्हणाले,मी लहानपणापासून हिंदू धर्माचे आचरण करत मोठा झालो.हिंदू धर्म हा अतिशय शांतताप्रिय असा धर्म असून हिंदू धर्मात दुसऱ्या धर्मावर हल्ला केला जात नाही तरीही हिंदू समाजाचे चुकीचे चित्रण केले जाते व गैरसमज पसरविले जातात आणि कधी कधी हे जाणीवपूर्वक केले जाते.माझ्यासह इतर चार खासदारांनी मध्यंतरी न्याय विभागाला पत्र पाठवून चिंता व्यक्त केली.गेल्या काही काळात कॅलिफोर्निया,न्यूयॉर्क याठिकाणी काय झाले हे सर्वांनी पाहिले आहेच.संपूर्ण अमेरिकेत सध्या हिंदूंवर हल्ल्याच्या घटना वाढत आहेत.हिंदू मंदिरांवर होणारे हल्ले नियोजित पद्धतीने होत असून त्यामुळे हिंदू समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असेही श्री ठाणेदार यांनी सांगितले.ठाणेदार असेही म्हणाले की,हल्ल्याच्या घटनेनंतर स्थानिक प्रशासन,पोलीस त्याची दखल घेतात मात्र तपास म्हणावा तसा पुढे जात नाही त्यामुळे कुणावरही अद्याप कारवाई झालेली नाही असे त्यांनी नमूद केले आहे.