यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ एप्रिल २४ बुधवार
येथे सुमारे एकशे अठरा वर्षांची परंपरा असलेल्या बालाजी महाराजांचा रथोत्सवाच्या मिरवणूकीनिमित्ताने काल दि.२३ एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी सहा वाजेचे सुमारास येथील प्रसिद्ध महर्षी व्यास मंदिराचे पायथ्या लगतच्या नदी पात्रातून बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.तसेच सायंकाळी सात वाजेचे सुमारास येथील महाराणा प्रताप नगराजवळ रथोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहाच्या वातावरणात घेण्यात आला.
यात्रेच्या निमित्ताने खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्ताने बारागाडया ओढण्यात आल्या.सदरहू रथोत्सवानिमित्त हरीता सरिता नदीपात्रात यात्रेचे आयोजन करण्यात आले.यानिमित्ताने १२ गाड्या ओढण्याचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी यात्रा पाहण्यासाठी शहरवासीयांची गर्दी मोठ्या प्रमाणात उसळली होती.प्रसंगी फैजपुर विभागाच्या उपविभागीय पोलीस उपअधीक्षक अन्नपूर्णासींग व पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकूर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि हरीष भोये,सपोनि विनोदकुमार गोसावी,पोलिस उपनिरिक्षक सुनील मोरे,पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान पठान यांच्यासह पोलीस कर्मचारी व गृहरक्षक कर्मचारी तसेच दंगा नियंत्रण पथक व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदोबस्त चोख राखला.यावेळी यावल रावेरचे आमदार शिरीष चौधरी,काॅंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सोनवणे,हाजी शब्बीरखान मोहम्मदखान तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व शांतता समिती सदस्य उपस्थित होते.