यावेळी सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले,श्री विठ्ठल गाभारा व रुक्मिणी गाभारा येथील संवर्धनाचे काम करतेवेळी मूर्तीच्या संरक्षणास कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही व याची दक्षता घेऊन तसेच मूर्ती संरक्षणास प्राधान्य देऊन कामास सुरुवात करण्यात आली. सदरचे काम करत असतांना काही नव्याने कामे निदर्शनास आल्याने या कामांसाठी ४५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे.सदरचे काम पूर्णत्वास येत असून संवर्धनाचे काम दर्जेदार व पुढील अनेक वर्ष टिकेल या दृष्टीने करण्यात आले आहे.याशिवाय दि.२ जून २४ पासून भाविकांच्या शुभहस्ते पूजा देखील सुरू करण्यात येणार आहेत तसेच आषाढी यात्रेच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाचा आढावा घेऊन भाविकांना अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.परिणामी लवकरच आगामी काळात भाविकांना आपल्या लाडक्या विठुरायाच्या पायावर डोके ठेऊन दर्शन घेता येणार आहे असे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.