Just another WordPress site

दहिगाव येथे दोन दिवसापासुनच्या संततधार पावसामुळे हजारो रुपयांचा गुरांचा चारा उध्वस्त तर अनेकांच्या घरात पाणी शिरले !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.३१ जुलै २६ शुक्रवार

तालुक्यातील दहिगाव येथे सतत धार पावसाने गुरांच्या गोठ्यासह घरात पाणी शिरल्याने हजारो रुपयांचे गुरांचा चारा ओला झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.दहिगाव येथील सुरेश आबा नगरात पाण्याचा तलाव साचला येण्या-जाण्याचा रहिवाशांना त्रास होत आहे.सावखेडा सिम रस्त्यालगत असलेल्या गुरांच्या गोठ्यांमध्ये गटारीचे काम अपूर्ण केल्यामुळे पाणी शिरले आहे तर एका घरात पाणी शिरून वस्तू खराब झालेले आहेत.

दरम्यान नथू शिवराम पाटील आणि सुनील धनराज पाटील यांचे घरात आणि गुरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने हजारो रुपयांचा चारा ओला झाला तर गुरे सुद्धा पाण्यातच आहेत.या ठिकाणी बांधकाम केलेल्या गटारीचे अपूर्ण काम केल्यामुळे हे पाणी या गोठ्यांमध्ये शिरले आहे.दरवर्षी पाणी कितीही आले तरी या गोठ्यांमध्ये पाणी शिरत नव्हते असे रहिवाशांचे म्हणणे आहे.पाण्याचा निचरा व्यवस्थित न काढल्याने आणि ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार झालेला असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.गटारीतून वाहून जाणारे पाण्याचे नियोजन संबंधित ठेकेदाराने करावे आणि याकडे ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ करीत आहेत तर दुसरीकडे आदर्श विद्यालयासमोर असलेल्या नाल्याला पाणी आल्याने चिमुकले या पाण्याचा आनंद घेत असताना दिसून येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.