Just another WordPress site

यावल तालुका शासकीय क्रीडा शिक्षकांची स्पर्धा सहविचार सभा उत्साहाच्या वातावरणात संपन्न

यावल-पोलीस नायक ( प्रतिनिधी) :-

दि.३१ जुलै २६ शुक्रवार

तालुका शासकीय क्रीडा स्पर्धा निमित्त क्रीडा शिक्षकांची सहविचार सभा आज दि.३१ जुलै २६ शुक्रवार रोजी जे टी महाजन इंग्लिश मिडीयम स्कूल यावल या विद्यालयातील कम्प्युटर लॅबमध्ये गटशिक्षणाधिकारी फिरोज पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडली.यावेळेस तालुक्यातील ४५ शिक्षक हजर होते.सदर सहविचार सभेस जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी,तालुका क्रीडा अधिकारी नितीन जंगम,जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी सचिन निकम,सुरेश थुरकुडे,विशाल बोडके,यावल तालुका शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष व माझी क्रीडा समन्वयक मुख्याध्यापक के यु पाटील,जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी नोकरांची पतपेढीचे संचालक सिद्धेश्वर वाघुळदे,क्रीडा समन्वयक दिलीप संगेले,मुख्याध्यापिका रंजना महाजन,प्राचार्य दिपाली धांडे,क्रीडा समिती सदस्य के आर सोनवणे,जितेंद्र फिरके,वाय जी कोळी उपस्थित होते.

सदरील सभेत सचिन निकम यांनी रजिस्ट्रेशन कसे करावे याच्याबद्दल माहिती दिली व वेब साईटची माहिती ऑनलाईन मिटींगमध्ये जाहिर करण्याचे अश्वासन देऊन सर्वांनी उपास्थित राहण्याचे आवाहन केले तर जिल्हा क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी क्रीडा शिक्षकांना तालुक्यातील स्पर्धेसाठी सहकार्य करण्याची व खेळाडूंना जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याची भावना व्यक्त केली.सहविचार सभा अंतर्गत क्रीडा समन्वयक दिलीप संगेले हे एन आय एस कोच पतियाळा झाल्याबद्दल,तर वाय जी कोळी यांचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.तसेच मुख्याध्यापक के यु पाटील,वाय वाय पाटील, मुख्याध्यापक एम आर महाजन,पी पी महाजन,सी के पाटील,ए डी पाटील यांचा सेवानिवृत्तबद्दल सन्मानपत्र,शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.सदर सहविचार सभेसाठी मिटींग हॉल उपस्थित करून दिल्याबद्दल संस्थेचे व उपस्थित सर्वांचे वाय जी कोळी यांनी आभार मानले.तर सिद्धेश्वर वाघुळदे यांनी स्पर्धेसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल असे सांगितले व शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापक के यु पाटील यांनी प्रस्तावना करून सूत्रसंचालन केले.सदर क्रीडा समन्वयकांनी सह विचार सभेत स्पर्धेचे नियोजन,ठिकाण आणि वेळ निश्चित केली तर स्पर्धेत मुलींची काळजी घेण्याचे आवाहन केले.खेळाडूंच्या पालकांना शासकीय क्रिडा स्पर्धांचे व प्रमाणपत्राचे महत्व समजून द्यावे म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी क्रीडा स्पर्धेकडे वळतील याचे महत्त्व पटवून दिले स्पर्धा सुरू असताना क्रीडा शिक्षकांनी बाहेरील पालक,स्पर्धेत नसणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत येण्यास बंदी घालवी जेणेकरून स्पर्धेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याबद्दल मार्गदर्शन केले.सदरील तालुकास्तरीय स्पर्धा या १० ते १५ ऑगस्ट पासून सुरू होतील.सहविचार सभेच्या नियोजनात सी एल धांडे,एन सी पाटील,एल ए बढे,हितेंद्र चौधरी,आय आय तडवी, जुबेर शेख,ए ए शेख,शेख सलीम,युसुफ खान,मो फैजलखान,डी पी बोदडे,एन सी मोरे,राजश्री भंगाळे,सौ आर एम पाटील,सौ डी डी ठाकरे यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.