मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ जून २४ शनिवार
जुलै २०२३ मध्ये अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले व त्यानंतर छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा झाली होती कारण शरद पवारांनी या फाटाफुटीनंतर जी पत्रकार परिषद घेतली त्यात छगन भुजबळ तिकडे काय चालले आहे हे बघून येतो म्हणाले आणि मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली असे वक्तव्य शरद पवारांनी केले होते.शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे हशाही पिकला होता.या सगळ्या घडामोडी झाल्यानंतर लोकसभेची निवडणूक पार पडली.लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भुजबळ चर्चेत आहेत.अजित पवारांवर जी टीका संघाच्या मुखपत्रातून करण्यात आली त्यांनी ते योग्य असल्याचे म्हटले आहे तसेच गेल्या काही दिवसांपासून त्यांची जी वक्तव्य समोर येत आहेत त्यावरुन भुजबळ महायुतीत नाराज असल्याचे बोलले जात आहे व ते शरद पवारांबरोबर जातील अशाही चर्चा आहेत याबाबत आता त्यांनीच उत्तर दिले आहे तसेच राज्यसभेबाबतही त्यांनी भाष्य केले आहे.मी राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होतो मात्र पक्षाने माझ्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची निवड केली.मी ज्यांना शाखाप्रमुख केले होते असे लोक संसदेत गेले व मंत्री झाले.४० वर्षे काम केल्यानंतर राज्यसभेवर जायची इच्छा होती मात्र आता पक्षाने जो निर्णय घेतला तो मान्य आहे असे छगन भुजबळ म्हणाले.टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे उत्तर दिले आहे तसेच शरद पवारांचे बोट पुन्हा धरणार का ? या प्रश्नाचेही उत्तर दिले आहे.
छगन भुजबळ यांना यावेळी अजित पवार गटात येण्याचा निर्णय चुकला का ? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी तुम्हाला वाटत असेल पण मला वाटत नाही असे भुजबळ म्हणाले तसेच सहानुभूतीबाबत मी जे बोललो.ते मतपेटीने दाखवून दिले अशी प्रतिक्रिया दिली.शरद पवार गटाकडे जाण्याचा दरवाजा उघडा ठेवलाय का ? असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला तेव्हा असे तुम्हाला वाटतं.हा तुमचा प्रचार आहे.या सर्वात मी नेहमी सत्याची बाजू घेत आलो आहे.मला जे वाटते खरे आहे तेच बोलतो.मला वाटले की या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे.तेव्हा सांगतो मला उत्तर नाही द्यायचे असे काही नाही.ना माझी खिडकी उघडी आहे ना माझा दरवाजा उघडा आहे.ना कोणी माझ्यासाठी रेड कार्पेट टाकले आहे असे काही नाही.वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात घेऊन पुढची पावले टाकायची आहे त्यातून काही धडा घ्यायचा आहे.पक्षाला आणि युतीला.ज्या त्रुटी आहे त्या दूर करायच्या आहेत.मी आहे त्या पक्षात युतीसोबत राहणार असे स्पष्ट उत्तर दिले आहे.