Police Nayak
Just another WordPress site
Sign in

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.

  • Friday, May 15, 2026

Police Nayak Police Nayak - Just another WordPress site

  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक
Police Nayak

“१० दिवसांत मला राज्यपाल केले नाही तर…” शिंदे गटातील नेत्याचा भाजपाला इशारा

राजकीयमहाराष्ट्र घडामोडी विशेष
By टीम पोलीस नायक On Aug 7, 2024 0

अमरावती -पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि .७ ऑगस्ट २४ बुधवार

राज्यपालपदासाठी आठ-दहा दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत कौर राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्राचे प्रकरण बाहेर काढणार ! असा इशारा माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाजपाला दिला आहे.अडसूळ म्हणाले,नुकतीच राष्ट्रपती कार्यालयाने नव्या राज्यपालांची एक यादी प्रसिद्ध केली असून यात आठ ते दहा जणांचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये कुठेही माझे नाव नाही याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो व त्यांना आठवण करून दिली की आपल्याला त्यांनी (भाजपाने) काय आश्वासन दिले होते व सध्या मी संयम ठेवला आहे.अजून आठ-दहा दिवस संयम ठेवेन व थोडी वाट पाहणार आहे अन्यथा मी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिका दाखल करणार आहे असे आनंद अडसूळ यांनी म्हटले आहे.सदरहू त्यांच्या या विधानामुळे महायुतीत जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आनंदराव अडसूळ म्हणाले,भाजपाने आम्हाला निवडणुकीच्या आधी दिलेला शब्द पाळला नाही आणि ही वस्तुस्थिती आहे.त्यांनी निवडणुकी आधी आम्हाला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही त्यामुळे माझ्या मनात चीड निर्माण झाली आहे.या सर्व वरिष्ठ मंडळींनी दिलेले आश्वासन पाळायला हव होते.शब्द देऊन ते (भाजपा) मागे फिरले आहेत.आम्ही मात्र दिलेला शब्द पाळला.मी लोकसभा निवडणूक लढलो नाही.मी ती निवडणूक लढलो असतो पण आम्ही आश्वासन पूर्ण केले.मी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलो असतो आणि जिंकलो देखील असतो त्यानंतर आज मी कॅबिनेटमध्ये मंत्री म्हणून दिसलो असतो कारण माझ्या पक्षात मीच सर्वात वरिष्ठ आहे तसेच माझ्याकडे मंत्रिपदाचा याआधीचा अनुभव देखील आहे या सर्व गोष्टी असतांना मला डावलले याची माझ्या मनात चीड आहे व जे काही घडले त्याबद्दल माझ्या मनात खंत का असू नये ? तसेच त्यांना (भाजपा) वाटत असेल माझ्याकडे काय पर्याय आहे तर माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाऊन क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे.सध्याची परिस्थिती पाहता मी आणखी १०-१२ दिवस वाट बघेन व या १०-१२ दिवसांत काही घडले नाही तर माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे.मला माहिती आहे न्यायालयात कशा पद्धतीने निकाल लागतात.परंतु माझ्या याचिकेवर सरन्यायाधीशांनी सुनावणी केली तर काही अपेक्षा ठेवायला हरकत नाही तसेच आपल्याला न्याय मिळू शकतो असे विधान त्यांनी केले आहे.

0
Share
टीम पोलीस नायक

Prev Post

“चुकीला माफी नाही” !! विधानसभेच्या तिकीट वाटपाबाबत नाना पटोलेंचे विधान

Next Post

पत्नीला घेऊन नाचल्याच्या रागातून भावजयीने केला दिराचा चाकूने खून

You might also like More from author
महाराष्ट्र घडामोडी विशेष

अखेर रिक्षाचालकांसाठी मराठी सक्ती लांबणीवर !! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मराठी…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

अनुसूचित जातींचे उपवर्गीकरणाचा भाजपाचा खटाटोप कशासाठी ? समाजात संतप्त भावना तर…

महाराष्ट्र घडामोडी विशेष

नरहरी झिरवाळ आणि तृतीयपंथी पवन यादवचा व्हिडीओ व्हायरल !! राजकीय वर्तुळात मोठी खळबळ !!

पक्ष संघटन विशेष घडामोडी

बुलडाणा विधानसभा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षप्रवेश सोहळा संपन्न…

Prev Next
Leave A Reply
Cancel Reply

Your email address will not be published.

Recent Posts

  • फैजपूर विभागात आगामी उत्सवांच्या नियोजनासाठी पोलीस पाटलांची आढावा बैठक संपन्न !!
  • रावेर विधानसभा शिंदे शिवसेना गट युवा सेना संपर्क प्रमुखपदी यावलचे राहुल बारी यांची नियुक्ती !!
  • पोलीस बॉईज असोसिएशनच्या आंदोलनाला यश !! पोलीसांच्या गृहकर्ज अग्रिम लोनसाठी १७कोटी रुपये मंजूर !!
  • यावल नगराध्यक्षाच्या प्रयत्नातून हतनुर धरणातील पाणी साठवण तलावात सोडण्यात आल्याने पाणीप्रश्न मिटला !!
  • पुरस्कारांचा बादशहा डॉ डिगंबर तायडे पंजाब सरकारच्या “भारत विभूषण” पुरस्काराने सन्मानित !!

Recent Comments

  1. टीम पोलीस नायक on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
  2. Digambar Tayade on “शकुंतला तायडे महाराष्ट्राची हिरकणी पुरस्काराने सन्मानित”
© 2026 - Police Nayak. All Rights Reserved.
Sign in
  • Home
  • देश विदेश
  • जळगाव जिल्हा
  • जळगाव विशेष
  • ग्रामीण विशेष
  • अहमदनगर जिल्हा
  • धुळे जिल्हा
  • नंदुरबार जिल्हा
  • नाशिक जिल्हा
  • कृषी
  • क्राईम
  • खेळ
  • पारंपरिक
  • महाराष्ट्र
  • मुंबई विशेष
  • राजकीय
  • राज्य
  • राज्य सरकार विशेष
  • रेल्वे प्रशासन
  • रोजगार विषयक
  • वैचारिक
  • शैक्षणिक
  • सामाजिक

Welcome, Login to your account.

Forget password?
Sign in

Recover your password.

A password will be e-mailed to you.