एकनाथ खडसे आता दुसऱ्या पक्षात गेले आहेत त्यांचे काय झाले ? त्यांचे काहीच राहिले नाही.आता विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामुळे घोडा मैदान जवळ आहे.एकनाथ खडसे हे देखील जळगावमध्ये खूप मोठे नेते होते.त्यांचा मोठा प्रभाव होता मात्र ते दुसऱ्या पक्षात गेले मग त्यांचे काय झाले ? एकनाथ खडसे हे आता सांगत असतील की माझे असे होते माझी दूध डेअरी होती मात्र ते भारतीय जनता पक्ष सोडून गेले आणि त्यानंतर त्यांच्या पत्नी देखील निवडून आल्या नाहीत.दूध डेअरीच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीचाही पराभव झाला असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी केला.आमचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे त्या ठिकाणी जामनेरमध्ये १५० किलोमीटर जाऊन त्यांच्या मतदारसंघात उभे राहिले होते.मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्या पत्नीचा पराभव केला.त्या दूध डेअरीच्या संचालक होत्या मात्र त्यांच्या संचालकांपैकी कोणीही निवडून आले नाही.एवढेच नाही तर जिल्हा बँकेमध्येही त्यांचे काही राहिले नाही.विधानसभेला त्यांच्या कन्येचा देखील पराभव झाला त्यामुळे कोणी पक्षात आले आणि गेले हे सुरुच राहणार,आमच्याकडे पक्ष संघटनेचे काम जोरात सुरु आहे अशी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केली आहे.