मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे हे गॅझेट खोटे ठरवणार आहेत का ? मनोज जरांगेंच्या अर्धवट ज्ञानातून ओबीसी समाजाचा घात करायचा असेल तर आम्हीही अभ्यासू आहोत.आमच्या अंगावर गॅझेट मारत असाल तर ही सगळी गॅझेट आम्ही तुम्हाला पोस्टाने पाठवतो असे म्हणत सगळी गॅझेट यावेळी मंगेश ससाणे यांनी सादर केली.मराठा आणि कुणबी समाज वेगळा आहे हे सगळ्या गॅझेटमध्ये आले आहे.आमचे एक मनोज जरांगेंना सांगणे आहे की तांत्रिक आणि कायदेशीर दृष्ट्या तुम्ही कधीही आव्हान द्या आम्ही त्याचे उत्तर देऊ शकतो.महाराष्ट्राच्या समोर आम्ही गॅझेट आणले आहे.जरांगेंनी गॅझेट वाचावे आणि अज्ञानी तसेच आततायी मागण्या करु नये.ओबीसींच्या ताटामध्ये मीठ कालवू नये.आमच्याकडून हे गॅझेट घेऊन जा असेही मंगेश ससाणेंनी म्हटले आहे.