राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.रतन टाटांना राज्य शासनाकडून अशा रितीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचे उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे.मला शालेय जीवनापासून वाटायचे की रतन टाटा यांना भेटावे पण गेल्यावर्षी जो पुरस्कार जाहीर झाले त्याचे पत्र देण्यासाठी मी गेलो होतो अशी आठवणही उदय सामंत यांनी सांगितली. टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची प्राणज्योत ९ ऑक्टोबर या दिवशी मालवली.ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रकृतीच्या तक्रारी जाणवत होत्या.उद्योग जगतातील दयाळू व्यावसायिक अशी त्यांची प्रतिमा होती.त्यांनी समाजासाठी खूप मोठे योगदान दिले आहे त्यांच्या निधनानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत.आता महाराष्ट्र सरकारने रतन टाटांचे नाव उद्योगरत्न पुरस्काराला देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली असून उद्योग क्षेत्रासह राजकीय,सामाजिक आदी विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत तसेच एनसीपीए ते वरळीतील स्मशानभूमी  दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.अंत्यसंस्कारासाठी होणारी गर्दी लक्षात घेता एनसीपीएपासून वरळीपर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्यामुळे डॉ. ई.मोझेस मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.वरळी नाका ते रखांगी चौकपर्यंत डॉ.ई.मोझेस मार्ग बंद ठेवण्यात येणार असून दुपारी १ ते रात्री ९ वाजेपर्यंत या मार्गिका बंद ठेवण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.या कालावधीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या वाहनांशिवाय इतर वाहनांना ई.मोझेस मार्गावर प्रवेश करता येणार नाही.