“आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही” !! आचारसंहिता जाहीर होताच मनोज जरांगेंचा थेट इशारा
सामाजिक चळवळीत काम करत असताना वैचारिक मतभेद असतात पण मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळू द्यायचे नाही,मराठा समाजाचे पोर मोठे झाले तर आपले काय होईल,मराठ्यांची पोर आरक्षणापासून तसेच नोकऱ्यांपासून शिक्षणापर्यंत वंचित राहिले पाहिजे,हे पोर भिकारी झाले पाहिजे हे वचन देंवेंद्र फडणवीस यांनी घेतले होते.त्यांनी सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांच्या विरोधात अनेक षडयंत्रे रचली.त्यांची चाल आता यशस्वी झाली अशी टीकाही मनोज जरांगे यांनी केली.आतापर्यंत निर्णय घेणे हे देवेंद्र फडणवीसांच्या हातात होते.सत्ता त्यांच्या हातात होती म्हणून त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही.उलट मराठ्यांना डिवचण्यासाठी मुद्दाम १७ जातींचा समावेश ओबीसीत केला पण मराठ्यांना आरक्षण दिले नाही.तेव्हाच आम्हाला लक्षात आले की माणूस आपल्याला मराठा आरक्षण देणार नाही.अखेर त्यांच्या पोटात जे होते ते आता बाहेर आले आहे असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणीस यांना मराठ्यांचे वाटोळ करायचे होते.आम्ही मराठ्यांना मोजत नाही हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.आजपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यायचे की नाही हा सत्ताधारी म्हणून त्यांचा निर्णय होता मात्र आता त्यांना मत द्यायची की नाही हे मराठा समाजाच्या हाती आहे.सत्तेत असूनही देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण दिले नाही त्यामुळे आता देवेंद्र फडणवीसांचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.