दरम्यान महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी साधलेल्या संवादानुसार लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे तसेच बोनसबाबतचे वृत्त खोटे असून सरकारकडून अशी कोणतीच घोषणा झालेली नसल्याचे आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे तसेच काही दिवासंपूर्वी मोबाईल गिफ्ट मिळणार असल्याचेही सांगण्यात येत होते मात्र याबाबतही कोणताच शासन निर्णय झालेला नाही.दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक अफवा पसरवल्या जात आहेत त्यामुळे अनेक महिलांची फसवणूक होऊ शकते.लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनासंदर्भात अधिकृत माहिती घेण्याकरता सरकारच्या संकेतस्थळावर जाऊनच खातरजमा करून घ्या अन्यथा तुमची आर्थिक फसवणूक होऊ शकते.त्याचबरोबर “लाडक्या बहिणींना अडीच हजार रुपये दिवाळी बोनस व मोबाईल गिफ्ट हि केवळ अफवा” असल्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून नमूद करण्यात आले आहे.