महाविकास आघाडीच्या पाच प्रमुख घोषणा काय?

१) महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास लागू करणार.

२) शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार.

३) जातनिहाय जनगणना करणार,५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार.

४) २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे दिली जाणार.

५) बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत दिली जाणार या घोषणा महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून महाविकास आघाडीच्या वतीने आमचा प्रचार सुरु झाला आहे.राहुल गांधी,उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आम्ही सभा घेतली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी देखील त्या सभेला उपस्थित होतो.प्रचाराची सुरुवात आम्ही केली आहे.मी आता नागपूरला आहे.नागपूरमध्ये तीन सभा घेतल्या जाणार आहेत.महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवे आहे व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम आम्हाला करावे लागणार आहे.आजपासून राज्यांमध्ये दौऱ्यांवर निघाले आहेत.दरम्यान सदाभाऊ खोतांनी जे वक्तव्य केले आहे त्यावर काहीही भाष्य शरद पवार यांनी केले नाही.जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही मागणी आम्ही मागची तीन वर्षे करतो आहोत त्यामुळे वस्तुस्थिती कळेल आणि आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंबंधीचे चित्र स्पष्ट होईल तसेच बटेंगे तो कटेंगे या योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरही त्यांनी काहीही भाष्य केले नाही.