“महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल !! महायुतीच्या सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही !! रोहित पवार यांची स्पष्टोक्ती
रोहित पवार म्हणाले,भोसरीमध्ये गेल्या काही वर्षात ठराविक लोकांचा विकास झाला आहे व आता बदल घडेल.भोसरी विधानसभेतून अजित गव्हाणे हे निश्चित आमदार होतील तसेच अजित पवारांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरून महायुतीचा पराभव दिसत आहे त्यांना बहुमत मिळणार नाही.अजित पवारांच्या पक्षाला वाटत आहे.आपण किंग मेकर म्हणून काम करू परंतु महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकमेकांची गळचेपी करत आहेत.५७ ठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केले आहेत.महायुतीचा शंभर टक्के घोळ होणार आहे.अजित पवारांचे नेते घाबरलेले आहेत.पुढे ते म्हणाले,१७० आमदार महाविकास आघाडीचे निवडून येणार आहेत.मुख्यमंत्री सुद्धा महाविकास आघाडीचा होणार आहे व सत्ता स्थापनेसाठी आम्हाला महायुतीच्या सोबत असलेल्या पक्षांची मदत लागणार नाही असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.