रोहित पवार म्हणाले,विरोधकांना त्यांचे साम्राज्य जपायचे आहे परंतु तुम्हाला शहराच पूर्वीच वैभव परत आणायच आहे याकरिता राहुल कलाटे यांना निवडून आणा. पिंपरी- चिंचवड परिसरात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मोठमोठ्या कंपन्या आणल्या.शरद पवार यांनी चालना दिली.सगळ्यात मोठ आयटी पार्क देखील आपल्याच शेजारी आहे याचा देखील फायदा या शहरातील नागरिकांना झाला.पिंपरी-चिंचवड मध्ये अवघा महाराष्ट्र वसलेला आहे.शहरातील याच नागरिकांना भाजपने दाबण्याचा प्रयत्न केला आहे.भ्रष्टाचार आणि राजकारण हेच या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी केले.गुजरातला ३२ आयटी कंपन्या जाणार आहेत.तीन लाख नागरिकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत.या सत्ताधाऱ्यांना केवळ गुजरातचा विकास करायचा आहे.या ठिकाणचे टाटा सारखे मोठे प्रकल्प देखील गुजरातला घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत.गेल्या दहा वर्षात एकही आयटी कंपनी नवीन आलेली नाही उलट अनेक कंपन्या गेल्या आहेत असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.