३० वर्षांमधील सर्वाधिक मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ६ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६५.११ टक्के मतदान झाले आहे.गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे पाहायला मिळाले आहे.१९९५ साली ७१.६९ टक्के मतदानाची नोंद झाली होती.अलीकडच्या काही वर्षांमध्ये राज्यात कधीच ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले नव्हते.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६१.३९ टक्के मतदानाची नोंद झाली होती तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते.मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ३.७ टक्के मतदान वाढले आहे ही मतदानाची वाढलेली आकडेवारी निवडणुकीच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.दरम्यान २०१९ मध्ये राज्यात ८.८५ कोटी नोंदणीकृत मतदार होते त्यात गेल्या पाच वर्षांमध्ये ९.५ टक्के वाढ झाली असून राज्यात आता ९.६९ टक्के मतदार आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी

अहमदनगर-७१.७३ टक्के,
अकोला-६४.९८ टक्के,
अमरावती-६५.५७ टक्के,
औरंगाबाद-६८.८९ टक्के,
बीड-६७.७९ टक्के,
भंडारा-६९.४२ टक्के,
बुलढाणा-७०.३२ टक्के,
चंद्रपूर-७१.२७ टक्के,
धुळे-६४.७० टक्के,
गडचिरोली-७३.६८ टक्के,
गोंदिया-६९.५३ टक्के,
हिंगोली-७१.१० टक्के,
जळगाव-६४.४२ टक्के,
जालना-७२.३० टक्के,
कोल्हापूर-७६.२५ टक्के,
लातूर-६६.९२ टक्के,
मुंबई शहर-५२.०७ टक्के,
मुंबई उपनगर-५५.७७ टक्के,
नागपूर-६०.४९ टक्के,
नांदेड-६४.९२ टक्के,
नंदुरबार-६९.१५ टक्के,
नाशिक-६७.५७ टक्के,
उस्मानाबाद-६४.२७ टक्के,
पालघर-६५.९५ टक्के,
परभणी-७०.३८ टक्के,
पुणे-६१.०५ टक्के,
रायगड-६७.२३ टक्के,
रत्नागिरी-६४.५५ टक्के,
सांगली-७१.८९ टक्के,
सातारा-७१.७१ टक्के,
सिंधुदुर्ग-६८.४० टक्के,
सोलापूर-६७.३६ टक्के,
ठाणे-५६.०५ टक्के,
वर्धा-६८.३० टक्के,
वाशिम-६६.०१ टक्के,
यवतमाळ-६९.०२ टक्के असे मतदान झाले आहे.