काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आमदारकीची शपथ आम्ही निषेध म्हणून घेतलेली नाही.जल्लोष,उत्साहाचे वातावरण असते त्यामुळे मनात हाच प्रश्न पडतो की जनतेने दिलेला कौल आहे की निवडणूक आयोगने दिलेला कौल आहे ? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.एवढ्या बहुमताने सरकार निवडून आले आहे पण कुठलाही जल्लोष नाही.मध्यंतरीच्या काळात काँग्रेस किंवा आम्ही सगळे असू आम्ही निवडणूक आयोगाकडे आमचे प्रश्न उपस्थित केले आहेत.ते प्रश्न जनतेच्या मनातले प्रश्न आहेत.आम्ही राजकीय पक्ष म्हणून उपस्थित करतो तसेच मार्कडवाडी नावाचे गाव आहे तिथेही जनतेने मॉकपॉल मागितला होता.जनतेच्या मनातल्या शंका आहेत त्यासाठी हे तिथल्या लोकांनी मागितले होते.बॅलेट पेपरवर किती जागा कोण जिंकते आणि त्याविरोधात ईव्हीएमवर कोण कसे जिंकते हे आम्ही दाखवून दिले आहे मात्र त्या गावात कर्फ्यू लावण्यात आला.२० जणांना अटक करण्यात आली.आम्ही हरलेले नाहीत तरीही आमच्या मनात ईव्हीएमबाबत शंका आहे.आम्ही जनतेचा मान राखून शपथ घेणार नाही.लोकशाहीचा मोर्चा आम्ही हाती घेत आहोत त्याची सुरुवात होते आहे.२०१४ पासून लोकशाही मारण्याचे काम सुरु आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

“विधानसभेचे निकाल लागले आणि अनेक ठिकाणी अनेकांच्या मनात खदखद सुरु झाली.या निकालांवर महाराष्ट्राचा विश्वास कसा बसेल हा प्रश्न आहेच.मार्कडवाडीने भूमिका घेतली ती बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची.बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायची असतांना निवडणूक आयोग मधे आला.मला माझ्या गावात निवडणूक घ्यायची असेल तर पोलिसांचा काय संबंध ? तुम्ही हे घ्यायचेच नाही असे का ? गावातल्या लोकांच्या निर्णयावर वरवंटा फिरवण्याचे काम लोकशाहीने निवडून आलेले लोक करत असतील तर हे लोकशाहीने निवडूनच आलेले नाहीत.पाच वाजताचे मतदानाचे प्रमाण वेगळे,त्यानंतरचे वेगळे असे कसे होऊ शकते ? १ ची बेरीच पाचवेळा केल्यावर ते पाच होतात सहा कसे आले ? निवडणूक आयोगाने जो प्लान आखला होता त्यावर बोलावेच लागेल.” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

नाना पटोले काय म्हणाले?

महाराष्ट्रातल्या जनतेच्या ज्या जनभावना आहेत ते पाहून आम्ही शपथ घ्यायची नाही हा निर्णय आम्ही घेतला आहे.महाराष्ट्रातले सरकार जनतेतले नाही.जनतेतले सरकार असते तर आझाद मैदानावर जनतेचे कोट्यवधी रुपये खर्च केले नसते.शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत आणि सरकार शपथविधीसोहळा हा राज्याभिषेकासारखा होत असेल तर आम्ही जनतेच्या बाजूच मांडणार आहे.आम्ही शपथ न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.आम्ही उद्धव ठाकरे,शरद पवार,राहुल गांधींशी चर्चा करुन यापुढचा निर्णय घेऊ असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.